आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नायलाॅन मांजाविराेधातील क्लिप अाता चित्रपटगृहात, ‘प्रतिसाद’ पाेलिस अायुक्तालयाचा उपक्रम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: नायलाॅन मांजामुक्त संक्रांत चित्रफितीचे अनावरण करताना पाेलिस अायुक्त जगन्नाथन. समवेत विजय पाटील, बबन बाेडके.
नाशिक - नायलाॅनचा मांजा किती जीवघेणा अाहे, याविषयीची सचित्र माहिती देण्यासाठी प्रतिसाद बहुउद्देशीय सेवा मंडळ अाणि पाेलिस अायुक्तालय यांच्या संयुक्त विद्यमाने ४६ सेकंदांची चित्रफीत तयार करण्यात अाली अाहे. ही फीत सर्वच मल्टिप्लेक्स अाणि चित्रपटगृहांमध्ये दाखविण्यात येणार अाहे. त्याचप्रमाणे साेशल मीडियावरही ती पाठविण्यात येत अाहे. ‘दिव्य मराठी’च्या नायलाॅन मांजामुक्त अभियानांतर्गत हा उपक्रम राबविण्यात येत अाहे.

नायलाॅन मांजाचा वापर कमी करण्यासाठी विविध सामाजिक संस्था प्रयत्न करीत अाहेत. यासाठी ‘दिव्य मराठी’च्या अभियानाची संबंधित संस्थांना मदत हाेत अाहे. याच अंतर्गत प्रतिसाद बहुउद्देशीय संस्था पाेलिस अायुक्त कार्यालय यांनी नायलाॅन मांजामुक्त संक्रांतीचा संदेश देण्यासाठी छाेटेखानी चित्रफीत तयार केली अाहे. ही चित्रफीत बुधवार(दि. १३)पासून सर्व चित्रपटगृहांत तीन ते चार दिवस दाखविण्यात येईल. यात नायलाॅन मांजाने माणसे अाणि पक्ष्यांना कशी इजा हाेते, हे विशद करण्यात अाले अाहे. त्यासाठी ‘दिव्य मराठी’तील बातम्या अाणि छायाचित्रांचा उपयाेग करण्यात अाला अाहे. या चित्रफितीचे अनावरण पाेलिस अायुक्त एस. जगन्नाथन यांच्या हस्ते झाले. यावेळी सहायक अायुक्त गुलाब चाैधरी, उपायुक्त एन. अंबिका, अविनाश बारगळ, श्रीकांत धिवरे, सहायक उपायुक्त विजयकुमार चव्हाण, रवींद्र वाडेकर, प्रशांत वागुंदे, ‘प्रतिसाद’चे संस्थापक अध्यक्ष बबन बाेडके अादी उपस्थित हाेते. चित्रफितीसाठी वरिष्ठ निरीक्षक शांताराम अवसरे भारत गाेस्वामी यांचे मार्गदर्शन लाभले अाहे. उमेश नागरे यांनी चित्रफीत तयार केली अाहे. ही चित्रफीत व्हाॅट्सअॅपवर काेणाला हवी असल्यास त्यांनी ९९२१११९२४० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे अावाहन करण्यात अाले अाहे.
शाळा, साेशल मीडियावरही जागृती
शहरातील चित्रपटगृहे,शाळा साेशल मीडियावर ही चित्रफीत दाखवून जनजागृती करण्यात येणार अाहे. त्यासाठी ‘दिव्य मराठी’च्या अभियानाची अाम्हाला माेठी मदत झाली अाहे.- बबन बाेडके, संस्थापकअध्यक्ष, प्रतिसाद बहुउद्देशीय सेवा मंडळ