आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुराधा चित्रपटगृहाला लवकरच मल्टीप्लेक्स रुपडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड- नाशिक विभागातील पहिल्या वातानुकूलित अनुराधा चित्रपटगृहाचे लवकरच मल्टीप्लेक्स मध्ये रूपांतरीत होणार आहे. मल्टीप्लेक्ससाठी योग्य अशा चित्रपटगृहाची उभारणी करण्यासाठी सिंगल स्क्रीन असलेले अनुराधा चित्रपटगृह काही कालावधीसाठी बंद ठेवण्यात आले आहे.
एक स्क्रीनच्या चित्रपटगृहाच्या प्रेक्षकांची संख्या घटल्याने प्रेक्षकांची मल्टीप्लेक्सला पसंती असल्याने दि. ३१ मार्च १९७६ मध्ये उद‌्घाटन झालेले अनुराधा चित्रपटगृह बंद करण्यात आले. नाशिकरोड शहरातील सुमारे ४० वर्षांपूर्वी प्रेक्षकांचे सर्वाधिक पसंतीचे अनुराधा चित्रपटगृहालादेखील प्रेक्षकांच्या आवडीनिवडीचा फटका बसत असल्याने संचालकांनी चित्रपटगृहाचे मल्टीप्लेक्स मध्ये रूपांतर करण्याचा निर्णय घेतला. मल्टीप्लेक्सशी संबंधित दोन ते तीन कंपन्याशी चर्चा सुरू असून, एका कंपनीशी करारानंतर त्यांच्या नियोजनानुसार अनुराधा चित्रपटगृहाचे मल्टीप्लेक्समध्ये रूपांतर हाेणार आहे. शहर परिसरातील गरीब प्रेक्षकांचे चित्रपटगृह म्हणून ओळख असलेल्या अनुराधा चित्रपटगृह नाशिकरोडच्या अनेक राजकीय, सामाजिक घडामोडीचे साक्षीदार राहिले आहे.
अनेक हिंदी, मराठी चित्रपटांनी येथे जास्तीत जास्त आठवडे चालण्याचा विक्रम केला आहे.रेजिमेन्टल बिटकाेनंतर अनुराधा टाॅकिज बंद झाल्याने गरीब प्रेक्षक चित्रपट बघण्यापासून वंचित झाले आहे. अनुराधाचे काम पूर्ण हाेण्याची कालमर्यादा निश्चित नसल्याने प्रेक्षक करमणुकीपासून वंचित राहणार आहे.
चित्रपट रसिकांसाठी निर्णय
चित्रपट प्रेक्षकांचा मल्टीप्लेक्सकडे ओढा वाढला आहे. एकापेक्षा अधिक स्क्रीन असल्याने कोणता चित्रपट बघायचा याचा पर्याय उपलब्ध झाला आहे. एक स्क्रीनच्या प्रेक्षकांची संख्या घटल्याने चित्रपटगृहाचे मल्टीप्लेक्समध्ये रूपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे.
अमर कलंत्री, संचालक, अनुराधा चित्रपटगृह
बातम्या आणखी आहेत...