आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सराफांना अांदाेलन मागे घेण्याचे अार्जव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - देशभरातील सराफी व्यावसायिक गुरुवारी (ता. १७) दिल्लीत रामलीला मैदानावर धरणे अांदाेलन करणार असतानाच बुधवारी अबकारी विभागाने सराफांना अांदाेलन मागे घेण्याचे अार्जव केले अाहे. एक टक्का अबकारी कर लागू केल्याचा त्रास सराफी व्यावसायिकांना हाेणार नसून, सहा काेटींवर वार्षिक व्यावसायिक उलाढाल असलेल्यांनाच नाेंदणी करावी लागणार असल्याचे अधिकारी केंद्रीय अबकारी विभागाचे सेवाकर अायुक्त राजपाल शर्मा यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

साेन्याच्या दागिन्यांवर एक टक्का अबकारी कर लावण्याच्या निर्णयास सराफी संघटनांनी विराेध केला अाहे. गेल्या १५ दिवसांपासून त्यांनी बेमुदत संप पुकारला असून, केंद्रीय मंत्र्यांपासून पंतप्रधानांनाही हा कर रद्द करण्यासाठी साकडे घातले अाहे, मात्र सरकार अापल्या भूमिकेवर ठाम अाहे. गुरुवारी दिल्लीत सात लाख सराफ धरणे अांदाेलन करून सरकारचे लक्ष या प्रश्नाकडे वेधणार अाहेत. केंद्रीय अबकारी अायुक्तांनी या अांदाेलनाच्या पूर्वसंध्येलाच या कराबाबत स्पष्टीकरण दिले अाहे.

या करासाठी अाॅनलाइन नाेंदणी अर्जाची तरतूद, उत्पादन शुल्क भरणे अाणि विवरणपत्र दाखल करता येणार असून विभागीय अधिकाऱ्यांचा त्यात हस्तक्षेप असणार नाही. अधिकाऱ्यांनी दुकानात जाऊन झडती घेण्याबाबत कुठलीही तरतूद यात नसल्याकडे शर्मा यांनी लक्ष वेधले. चांदीच्या दागिन्यांवर हा कर अाकारला जाणार नसल्याचे सांगतानाच ‘जाॅबवर्क’च्या अाधारे दागिन्यांची निर्मिती करणारे कारागीर किंवा सुवर्णकार यांना केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाकडे नाेंदणी करण्याची गरज नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अशा अाहेत साधारण तरतुदी
एकावर्षात लघुउद्याेग उत्पादन शुल्क सवलत मर्यादा सहा काेटी रुपये ठेवली अाहे. १२ काेटी रुपये उच्च पात्रता मर्यादेची तरतूद अाहे. वार्षिक उलाढाल १२ काेटींहून अधिक असणाऱ्या सराफांना हे उत्पादन शुल्क भरावे लागेल. १२ काेटींपेक्षा कमी उलाढाल असलेले व्यावसायिक पुढील अार्थिक वर्षात सहा काेटी रुपयांपर्यंत सवलत मिळविण्यास पात्र ठरतील. व्हॅटसाठी दिले जाणारे विवरणपत्रही मान्य केले जाणार असून, ते दर तीन महिन्यांनी भरावे लागेल. नाेंदणीसाठी पत्ताही तपासला जाणार नाही.
बातम्या आणखी आहेत...