आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीची कायदेशीर लढ्याची तयारी, शिवसेनेला देणार मात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदावर राष्ट्रवादीच्या कविता कर्डक यांची नियुक्ती रद्द करण्याचे आदेश राज्याच्या नगरविकास विभागाने दिल्यानंतर त्याविरोधात उच्च न्यायालयात कायदेशीर लढाई लढण्याची तयारी सुरू झाली आहे. न्यायप्रविष्ट बाब असताना राज्य सरकारने हस्तक्षेप कसा केला, या मुद्यावरून शासनाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होणार आहे.
तत्कालीन शिवसेनेचे पदाधिकारी सुधाकर बडगुजर यांच्याकडे महापालिकेचे विरोधी पक्षनेतेपद होते. मात्र, मार्च महनि्यात बडगुजर यांच्याएेवजी कर्डक यांची नियुक्ती महापौर अशोक मुर्तडक यांनी केली. त्यास बडगुजर यांनी हरकत घेतली होती. दरम्यान, भाजप आमदार बाळासाहेब सानप यांनीही नगरविकास विभागाकडे तक्रार केली होती. त्यावर सुनावणी झाल्यानंतर मंगळवारी राज्य शासनाने कर्डक यांची नियुक्ती रद्द करीत महापौरांना पंधरा दिवसांत नव्याने नियुक्ती करावी, असे आदेश दिले. त्यास कर्डक यांनी हरकत घेत यापूर्वी उच्च न्यायालयात विरोधी पक्षनेता निवडीबाबत याचिका प्रलंबित असताना, अचानक राज्य शासनाने हस्तक्षेप कसा केला, या मुद्यावरून दाद मागण्याची तयारी सुरू केली आहे. विभागीय आयुक्तांकडे दोन पक्षांनी मिळून नोंदवलेला एक गट विरोधी पक्षनेतेपदासाठी पात्र ठरताे का, असेही मार्गदर्शन मागवले जाणार आहे.
गेल्या चार वर्षांपासून शिवसेना राष्ट्रवादीत महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपदावरून कुरघाेडीचे राजकारण सुरू आहे. नगरविकास खात्याने याबाबत तक्रार आल्यानंतर त्यावर दिलेल्या निर्णयालाच आता राष्ट्रवादीने हरकत घेतली असून, या प्रश्नावर उच्च न्यायालयात जाण्याची तयारी सुरू केल्याने महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपदाचा मुद्दा आता चांगलाच तापणार असल्याचे चनि्ह दिसत आहे. न्यायप्रविष्ट बाब असताना राज्य शासन यात हस्तक्षेप कसा काय करू शकते, अशाप्रकारचा युक्तिवाद आता राष्ट्रवादीकडून केला जात आहे. या मुद्द्यावरून शिवसेनेला कायदेशीर उत्तर देण्याबरोबरच राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न असल्याचे यातून स्पष्ट होत आहे.
महापौरांचे लक्ष पत्राकडे
कर्डकयांची नियुक्ती रद्द करण्यासंदर्भात शासनाचे पत्र प्राप्त झाले नसल्याचा दावा महापौर अशाेक मुर्तडक यांनी केला. पत्र प्राप्त झाल्यानंतर कायदेशीर बाबी तपासून निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले. तूर्तास पत्र नसल्यामुळे काही बाेलता येणार नाही, असेही स्पष्ट केले.
बातम्या आणखी आहेत...