आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करवाढीविराेधात महासभेत विराेधी पक्षांचा अाज एल्गार, भाजपला घेरणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- घरपट्टीत १८ टक्के तर पाणीपट्टीत पाच वर्षांत तब्बल १२० टक्के करवाढ करण्याविराेधात शनिवारी (दि. १९) हाेणाऱ्या महासभेत विराेधी पक्षाचे नगरसेवक अाक्रमक भूमिका घेणार अाहेत. ४१ काेटी रुपयांची थकबाकी तसेच करबुडव्यांवर कारवाई करण्याचे साेडून प्रामाणिक करदात्यांवर करवाढीचा वरवंटा फिरवल्यामुळे भाजपला घेरण्याची तयारी विराेधी पक्षांनी केली अाहे. प्रबळ विराेधी पक्षाच्या भूमिकेत असलेली शिवसेना काळ्या फिती फलक दाखवून निषेध करण्याची शक्यता असून, काँग्रेस राष्ट्रवादीचे नगरसेवक सभागृहात विराेध करतील तर राष्ट्रवादी काँग्रेसने संघटना म्हणून सभागृहाबाहेर विराेध करण्यासाठी महापालिकेवर माेर्चा काढण्याचा स्वाक्षरी माेहीम राबवण्याचा निर्णय घेतला अाहे. 

पुढील वर्षापासून म्हणजेच सन २०१८-२०१९ या वर्षासाठी घरपट्टी पाणीपट्टीत वाढ करण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला. स्थायी समिती पूर्णपणे भाजपच्या ताब्यात असून, करवाढीला हाेणारा शिवसेना काँग्रेसचा विराेध झुगारण्यात अाला अाहे. त्यामुळे अाता महासभेत करवाढीला विराेध करण्यासाठी विराेधक एकवटले अाहेत. खासकरून शिवसेनेचे नगरसेवक अाक्रमक असून, महासभेच्या पूर्वसंध्येला सेनेच्या पार्टी मिटिंगमध्येही करवाढीला कसा विराेध करायचा यावर चर्चा झाली. प्रामुख्याने, शिवसेनेचे नगरसेवक सभागृहात काळे कपडे हातात निषेधाचे फलक घेऊन भाजपला खिंडीत पकडतील. सभेच्या सुरुवातीलाच भाजपकडून करवाढीबाबत स्पष्टीकरण घेण्याचा प्रयत्न असून त्यासाठी सेनेबराेबरच काँग्रेस राष्ट्रवादीचे नगरसेवकही अाक्रमक हाेणार अाहे. 

तर दशरथ पाटलांचे अांदाेलन
पालिकेचा खर्च कमी करून अन्य मार्गाने उत्पन्न शोधण्याचे साेडून नाशिककरांवर चुकीच्या पद्धतीने करवाढ लादली आहे. करवाढ मागे घेतल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा माजी महापौर दशरथ पाटील यांनी दिला आहे. जादा दराच्या निविदा काढणे, एकाच कामावर वारंवार खर्च करणे, लेखापरीक्षण विभागाच्या अंदाधुंद कारभारामुळे पालिकेची अार्थिक स्थिती खालावली अाहे. स्मार्ट सिटीच्या नावाखाली नाशिककरांची लूट हाेत अाहे. महत्त्वाचे म्हणजे, पाचशे चौरस मीटरला घरपट्टी माफ करण्याची घोषणा मुंबई पालिकेने केली मात्र, नाशिकमध्ये नगरसेवक निधीसाठी करवाढ हाेत असल्याची बाब धक्कादायक असल्याची टीका त्यांनी केली. सत्ताधारी विराेधकांच्या मिलीजुलीत नाशिककरांचे नुकसान हाेत असल्याचा अाराेप पाटील यांनी केला. 

महापालिका मुख्यालयासमाेर अाम अादमी पक्षाने करवाढीविराेधात निदर्शने केली. स्पष्ट बहुमत देऊन नाशिककरांनी भाजपला निवडून दिल्यानंतर त्यांनी करवाढीचे रिटर्न गिफ्ट दिल्याची टीकाही त्यांनी केली. ‘अाप’चे समन्वयक जितेंद्र भावे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित हाेते. 

काँग्रेस करणार मतदानाची मागणी
काँग्रेसच्यापक्षीय बैठकीत करवाढीच्या मुद्यावरून नगरसेवक अाक्रमक हाेण्याचा इशारा दिला. प्रामुख्याने गटनेते शाहू खैरे यांनी या मुद्यावर मतदान घेण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले. प्रश्न सत्तेचा नसून किती नगरसेवक करवाढीच्या बाजूने तर किती विराेधात याचा फैसला यानिमित्ताने हाेईल नाशिककरांना खरे पाठराखे काेण? याचाही उलगडा हाेईल, असे त्यांनी सांगितले. 

प्रहारकडूनही करवाढीचा निषेध
अामदारबच्चू कडू यांच्या प्रहार क्रांती संघटनेने करवाढीचा विराेध केला अाहे. करवाढी मागे घेतल्यास महापालिकेवर माेर्चा काढण्याचा इशारा संपर्कप्रमुख दत्तू बाेडके यांनी दिला. 

राष्ट्रवादी काढणार माेर्चा
राष्ट्रवादीकाँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी करवाढीविराेधात महापालिका मुख्यालयासमाेर विराट माेर्चा काढणार असल्याचे सांगितले. मुळात अाधीच नाशिककर महागाई जीएसटीच्या विचित्र करप्रणालीमुळे पिचलेले असताना त्यांच्यावर करवाढ का? असाही सवाल केला. घरपट्टी पाणीपट्टीची थकबाकी प्रथम वसूल करावी मग प्रामाणिक करदात्यांवर बाेजा टाकावा, अशी पक्षाची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी करवाढीला विराेध करीत जनतेचे मत अाजमावण्याचा निर्णय घेतला. या साठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी सहा विभागांत स्वाक्षरी माेहीम राबवणार असल्याचे खैरे यांनी सांगितले.
 
स्मार्ट सिटीसाठी करवाढ करणे गरजेचे असल्याचे सांगत भाजपचे अामदार तथा शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी घरपट्टी पाणीपट्टीतील करवाढीबाबत पक्षाच्या बैठकीत चर्चा करून अभ्यासाअंतीच निर्णय घेऊ, असे स्पष्ट केले. शनिवारच्या महासभेत करवाढीचा प्रस्ताव ठेवला जाणार नाही. काेणावर अन्याय हाेणार नाही महापालिकेचे नुकसान हाेणार नाही अशा पद्धतीने निर्णय घेऊ, असेही सानप यांनी सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...