आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Arakhada Parishad Chairman Mahant Ghyandas Maharaj, Nashik

ग्यानदासजींचे बहिष्कारास्र मागे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - आतापर्यंत बहुतांश जागांचे वाटप झाले असून, जागा वाटपाबाबत कोणत्याही प्रकारची समस्या उरलेली नाही. जे थाेडेबहुत प्लॉटस वाटायचे आहेत, ते येत्या एक-दोन दिवसांत पूर्ण केले जातील. बुधवारी काही जणांनी वाटपाबाबत वाद उत्पन्न केल्याने मी हा व्याप सोडून हनुमान गढीला जायचे ठरवले होते. मात्र, गुरुवारी सकाळपासूनच प्रशासनातील प्रमुख सर्वोच्च अधिकारी तसेच हरिद्वारचे शंकराचार्य हंसदेवाचार्य यांनी नाशकातून मुक्काम हलवण्याची गळ घातल्याने ‘मजबुरी’स्तव नाशकात थांबत असल्याचे सांगत बहिष्काराचे ब्रह्मास्रदेखील मागे घेत असल्याचे आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास महाराज यांनी पत्रकारांना सांगितले.

प्रशासनातर्फे तीन प्रमुख आखाड्यांचे जागा वाटप केल्यानंतर उर्वरित अनी आखाडे आणि खालसे यांना जागा वाटपाचे काम आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास यांनी बुधवारपासून हातात घेतले होते. त्यांनी बुधवारच्या दिवसभरात सर्व अनी आखाडे आणि निम्म्याहून अधिक खालशांना जागा वाटप केले होते.

ग्यानदासजींचे राजीमानास्र मागे
प्रारंभकेल्याने वादावादीला सुरुवात झाली. कुणाला पुढचे प्लॉट हवे होते, तर कुणाला मोठे प्लॉट हवे असल्याने त्यांनी महंत ग्यानदास यांच्या प्लॉट वाटप अधिकारावरच आक्षेप घेतल्याने या संपूर्ण वादाला वेगळीच किनार लाभली. त्या सगळ्या पार्श्वभूमीवर बुधवारी सायंकाळी महंत ग्यानदास यांना थोडासा त्रास झाल्याने त्यांनी सर्व काही सोडून अयोध्येला परतण्याचे संकेत दिले होते.
सूर्योदयापूर्वी प्रशासनाचे प्रमुख महंतांकडे...

महंत ग्यानदास यांनी साधुग्राममधून निघून जाण्याचे संकेत माध्यमांकडे दिल्याने जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, मनपा आयुक्त प्रवीण गेडाम आणि पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी सकाळी ते ६.३० दरम्यानच तपोवनात ग्यानदासजींच्या मुक्काम स्थळाकडे धाव घेतली. त्यांनी महंतांची एकत्रित भेट घेऊन नाशकातून मुक्काम हलवण्याची विनंती केली. दरम्यानच्या काळात हरिद्वारचे शंकराचार्य हंसदेवाचार्य यांनीदेखील स्वामीजींची भेट घेऊन किरकोळ कारणास्तव नाशिकचा मुक्काम हलवू नये, असे आवाहन केले. त्यामुळे महंत ग्यानदासजींनी त्यांचा निर्णय बदलत आता कुठेही जाता यथास्थित मकवाना हाऊस येथेच मुक्कामी राहणार असल्याचे मान्य केल्यानंतरच प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला. त्यामुळे सकाळी वाजेच्या आसपास आलेले हे सर्वोच्च अधिकारी सकाळी ८.३० वाजेच्या आसपास तिथून बाहेर पडले.

सायंकाळी मिटला विवाद
दरम्यान,तिन्ही आखाड्यांचे श्री महंत आणि आखाडा परिषद अध्यक्ष यांच्या उपस्थितीत जागा वाटपातील वाद मिटविण्यासाठी गुरुवारी सायंकाळी बैठक झाली. त्यात यापुढे सर्व प्लाॅटचे वाटप पूर्वसूत्रानुसारच करण्याचे ठरले. त्यानुसार आता तिन्ही अनी आखाड्यांचे श्री महंत आणि सचिव तसेच स्थानिक मेळा अधिका-यांच्या उपस्थितीतच प्लॉट वाटप केले जाणार आहे. आता प्रत्येक आखाडा त्याच्या खालशांना जागा वाटप करणार असल्याने खालशांची नाराजीदेखील दूर झाल्याने जागा वाटपाचा विवाद सध्या तरी संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत.