आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आखाड्यांचे ध्वजारोहण, भाजपाध्यक्ष अमित शहा आज, उद्या नाशकात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत बुधवारी त्र्यंबकेश्वर नाशिक येथील आखाड्यांचे ध्वजारोहण होणार आहे. त्यासाठी मंगळवारी (दि. १८) सायंकाळी नाशिकमध्ये दाखल होतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन हेदेखील त्यांच्याबरोबर या सोहळ्यास उपस्थित राहणार असल्याचेही सांगण्यात आले.

सिंहस्थ कुंभमेळ्यातील शाहीस्नानाची पहिली पर्वणी अवघ्या १२ दविसांवर येऊन ठेपली आहे. आता आखाड्यांचे धर्मध्वजारोहण, पेशवाईलाही सुरुवात झाली आहे. १९ ऑगस्टला प्रत्येक आखाड्यात स्वतंत्रपणे ध्वजारोहण होईल. त्र्यंबकमध्ये होणाऱ्या तीन आखाड्यांच्या सोहळ्यासाठी अमित शहा उपस्थित राहाणार, हे निश्चित झाले. मंगळवारी सायंकाळी ते मुंबईहून वाजता विमानाने निघून ओझरला येतील. नाशकातील शासकीय विश्रामगृहावर त्यांचे ६.२५ वाजता आगमन होईल. बुधवारी सकाळी ७.१५ वाजता ते त्र्यंबकेश्वरला प्रयाण करतील. ८.१५ वाजता गुरू गोरक्षनाथ मंदिर येथे पोहोचतील. तेथील प्राणप्रतिष्ठा सोहळा झाल्यानंतर ते सकाळी साडेदहा वाजता नाशिकला साधुग्राममधील कार्यक्रमास उपस्थित राहतील. दुपारी २.१५ वाजता ओझर विमानतळावरून विशेष विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील. पालकमंत्री गिरीश महाजनही त्यांच्यासोबत सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहातील. महाजन तीन दविस नाशिकमध्येच मुक्कामी राहतील. मुख्यमंत्र्यांचा अधिकृत दौरा अद्याप प्राप्त झालेला नाही.

नाशकातील आखाडे सज्ज
सिंहस्थ कुंभपर्वातील मानाचा सोहळा मानले जाणारे आखाड्यांतील ध्वजारोहण अवघ्या काही तासांवर येऊन ठेपले आहे. साधुग्राममधील निर्वाणी, निर्मोही आणि दिगंबर या तिन्ही अनी आखाड्यांमध्ये हा सोहळा बुधवारी (दि. १९)सकाळी वाजून १० मिनिटांच्या शुभमुहूर्तावर नियोजित क्रमानुसार होणार आहे. त्यासाठी ध्वजस्तंभ उभाण्यात आले असून, सर्व तयारी पूर्ण झाली आहे. जगद्गुरू आखाड्यातील प्रमुख श्री महंत आणि अन्य राजकीय नेत्यांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार असल्याची माहिती आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास यांनी दिली. यावेळी तिन्ही आखाड्यांचे प्रत्येकी अशा एकूण १८ पंडितांकडून दोन तास धार्मिक पूजाविधीच्या कार्यक्रमात सहभागी होतील. त्यानंतर जगद्गुरू रामानुजाचार्य प्रवेशद्वारापाशी ध्वजारोहणानिमित्ताचा सोहळा आणि प्रवेशद्वार शुभारंभाचा सोहळा होईल.