आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकचे माजी नगरसेवक अर्जुन गांगुर्डे यांचा रहस्यमयरीत्या मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि भाजपच्या विद्यमान नगरसेविका ज्योती गांगुर्डे यांचे पती अर्जुन (दाजी) गांगुर्डे यांचा रहस्यमयरीत्या मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी सकाळी उघड झाली. सिंधुदुर्गला कामानिमित्त जात असल्याचे कारण देत घर साेडणारे गांगुर्डे यांचा मृतदेह त्यांच्याच कारमध्ये पेठराेेडजवळ इंद्रप्रस्थनगरीलगत निर्जनस्थळी पडलेला हाेता. गांगुर्डे यांच्या मृत्यूमागे नेमका घातपात अाहे की अात्महत्या, याबाबत उलगडा झाला नसला तरी सकृत््दर्शनी मृत्यूमागे घातपाताची शक्यता गृहीत धरून पाेलिसांनी तपास सुरू केला अाहे. त्यांच्या खिशात सुसाइड नाेटही सापडल्याचे वृत्त असून, त्यात महापालिकेतील एका ठेकेदाराकडून हाेणाऱ्या जाचाचेही कारण दिले जात अाहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पेठरोडवरील इंद्रप्रस्थ कॉलनी परिसरातील मोकळ्या भूखंडावर उभ्या असलेल्या कारमध्ये एक व्यक्ती बऱ्याच वेळापासून पडून असल्याचा फाेन अाला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत म्हसरूळ पोलिस ठाण्याचे निरीक्षक नरेंद्र पिंगळे यांच्यासह पथक घटनास्थळी गेले. या ठिकाणी मारुती कार (एमएच १५ सीटी ०९४१)मध्ये चालकाच्या अासनाशेजारी गांगुर्डे हे जणू काही झाेपल्यागत पडलेले हाेते. गांगुर्डे यांचे कपडे तपासल्यानंतर त्यात एक चिठ्ठी अाढळल्यामुळे प्रथमदर्शनी अात्महत्येचा संशय बळावला. या चिठ्ठीत चार ठेकेदारांच्या नावांचा उल्लेख असून, ‘माझ्या मृत्यूला त्यांना जबाबदार धरावे, मला माफ करा’ असा मजकूर असल्यामुळे पाेलिस काेड्यात पडले. अात्महत्या झाली असेल तर या ठिकाणी संबंधित साहित्य असणे अपेक्षित हाेते. प्रत्यक्षात घटनास्थळावर पोलिसांना ग्लास, मुगडाळ, काही जडीबुटी आणि झाडांच्या मुळ्याशिवाय काहीच सापडले नाही. घातपाताच्या अनुषंगाने काहीच खुणा नसल्यामुळे मृत्यूचे रहस्य वाढले. दुपारी गांगुर्डे यांच्यावर जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केल्यावर त्यात विष घेतल्याचे निष्पन्न झाले. मात्र, प्रकार संशयास्पद असल्याने पोलिसांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना व्हीसेरा राखून ठेवण्यास सांगितले. घटनास्थळी आमदार बाळासाहेब सानप यांच्यासह भाजपचे नगरसेवक, पदाधिकारी आणि गांगुर्डे यांचा मित्र परिवार मोठ्या संख्येने दाखल झाला होता. जिल्हा रुग्णालयातही आमदार देवयानी फरांदे, पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंघल यांच्यासह सुहास फरांदे, पंचवटी प्रभागातील नगरसेवक, भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येने हजर होते. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणून घ्या सविस्तर बातमी...
बातम्या आणखी आहेत...