आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी नगरसेवक गांगुर्डे यांच्या मृत्यूचे गूढ कायम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शिवसेनेचे माजी नगरसेवक अर्जुन (दाजी) गांगुर्डे यांच्या मृत्यूचे गूढ कायम असून, या प्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात अद्याप कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. मात्र, पोलिसांकडून या प्रकरणाचा सर्वअंगाने तपास सुरू असून, काही बडी नावे या प्रकरणात पुढे येण्याची शक्यता तपासी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
माजी नगरसेवक अर्जुन गांगुर्डे यांचा मृतदेह पेठरोडवरील इंद्रप्रस्थ परिसरात त्यांच्याच कारमध्ये संशयास्पद अाढळून आला होता. त्यांच्या खिशात अाढळून आलेल्या चिठ्ठीच्या अाधारे गांगुर्डे यांनी आत्महत्या केली असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली होती. मात्र, घटनास्थळावर संशयास्पद वस्तू अाढळून आल्याने ही हत्या की आत्महत्या, याबाबत पोलिस यंत्रणा चक्रावली. शवविच्छेदन अहावालामध्येही विषाचे नमुने अाढळले नसल्याने हा घातपात असल्याची दाट शक्यता असल्याने व्हिसेरा तपासणीसाठी राखून ठेवला. सोमवारी धुळे नाशिक येथील न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत तपासणी केल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. दरम्यान, म्हसरूळ पोलिसांकडून चिठ्ठी गांगुर्डे यांच्या परिवाराला दाखवण्यात आली आहे. मात्र, गांगुर्डे परिवाराकडून अद्याप कोणाच्या विरोधात तक्रार दिली नसल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...