आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Army Attacking On Police Complain To Defence Minister Gurdian Minister Mahajan

जवानांच्या हल्ल्याची संरक्षण मंत्र्यांकडे तक्रार, नाशिकचे पालकमंत्री महाजन यांची माहिती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
येवला (जि. नाशिक) - पाेलिस व लष्करी जवान या दोघांकडेही जनतेच्या संरक्षणाची जबाबदारी आहे. त्यांनीच असे बेजबाबदारपणे वागणे चुकीचे आहे. नाशिकमध्ये पोलिस व लष्करी जवानांमध्ये झालेल्या हाणामारी प्रकरणाची आपण संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याकडे तक्रार केली असून, यापुढे असे प्रकार घडू नयेत म्हणून समन्वय समितीची स्थापना करणार असल्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

येवला येथे मकर संक्रांतीच्या निमित्ताने शुक्रवारी आयोजित पतंग महाेत्सवात महाजन सहभागी झाले होते. कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘राज्याला स्वतंत्र गृहमंत्री येईल का?’ या प्रश्नावर महाजन म्हणाले, ‘गृहमंत्री पद सध्या मुख्यमंत्र्यांकडे असून तेच या पदाला चांगला न्याय देऊ शकतात.’ अनेकांचे पतंग कापणार ‘छगन भुजबळ यांचा पतंग आम्ही लोकसभेतच कापला आहे. आता पाटबंधारे खाते, बांधकाम खाते या बरोबरच अनेकांचे पतंग कापले जाणार आहेत,’ असे सांगत महाजन यांनी अधिका-यांवर कारवाईचे संकेत दिले.