आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Arogya Vidnyan Vidyapith CCTV Camera Issue In Nashik

उत्तरपत्रिकांत गैरप्रकार घडूनही आरोग्य विद्यापीठाला येईना जाग

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- आरोग्य विज्ञान विद्यापीठाने परीक्षा विभागात होणार्‍या गैरप्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, अद्यापही ते बसविले नाही. त्यामुळे विद्यापीठाच्या परीक्षा विभागातून थेट उत्तरपत्रिका चोरीसारखी गंभीर घटना घडली असतानाही विद्यापीठ प्रशासनाने त्यास गांभीर्याने घेतले नसल्याचेच समोर आले आहे.

विद्यापीठातून उत्तरपत्रिका चोरीचा प्रकार दोन वर्षांपूर्वी घडला होता. असा प्रकार पुन्हा घडू नये, यासाठी परीक्षा विभागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार असल्याचे विद्यापीठाच्या वतीने सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात दुसर्‍या वर्षाच्या परीक्षा होऊन त्यांच्या उत्तरपत्रिकाही तपासणीसाठी आल्या. मात्र, अद्याप सीसीटीव्हीचे घोंगडे कंत्राटात अडकून आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भाडेतत्त्वावर कॅमेरे घेत पेपर तपासणीच्या काळापुरतीच बसविण्याची वेळ विद्यापीठावर येण्याची शक्यता वाढली आहे.

फेरनिविदा काढणार
कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला आहे. पण, टेंडरच्या दरात खूप तफावत आहे. फेरनिविदा काढणार आहोत. तसेच केंद्र शासनाचाही दराच्या बाबतीत अहवाल मागितला असून, 30 एप्रिलपर्यंत न मिळाल्यास मागील वर्षीप्रमाणेच पुन्हा भाडेतत्त्वावर घेऊ.
-डॉ. अरुण जामकर, कुलगुरू