आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निम्मी थकबाकी भरताच कॅन्टोन्मेंटला पाणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डासाठी देण्यात आलेले पाणी पूर्णपणे संपले असून, त्वरित आवर्तन देण्याची मागणी कॅन्टोन्मेंटच्या पदाधिकार्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे बुधवारी केली. मात्र, थकबाकी असलेले पाच लाख रुपये भरण्याची आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिल्याने काही काळ पदाधिकार्‍यांचे धाबे दणाणले. यानंतर खासदार हेमंत गोडसे यांनी मध्यस्थी केल्याने जिल्हाधिकार्‍यांनी कमीत कमी 3 लाख रुपये भरण्यास सांगत, पाटबंधारे विभागाचा अभिप्राय घेतल्यानंतर पाणी सोडण्याचे आश्वासन दिले.
यापूर्वी देण्यात आलेले आवर्तनाचे पाणी जवळपास संपले असून, पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने त्वरित 10 दलघनफूट पाणी तरी सोडावे अशी मागणी खासदार गोडसेंसोबत आलेल्या कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या पदाधिकारी शिष्टमंडळाने केली. चर्चेअंती जिल्हाधिकार्‍यांनी तूर्तास दोन लाख नंतर भरण्याचे सांगत तीन लाख भरण्याची मागणी केली. तसेच पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडून उपलब्ध पाण्याचा अहवाल मागवून त्यानंतरच त्यांच्या अभिप्रायासह पाणी सोडण्याचे आश्वासन दिले. अहवाल लागलीच गुरुवारीच मागविण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीस मेळा अधिकारी महेश पाटील, उपजिल्हाधिकारी जितेंद्र काकुस्ते तसेच कॅन्टोन्मेंट बोर्डच्या उपाध्यक्षा सुरेखा गोडसे, नगरसेवक दिनकर पाळदे, सुरेश कदम, तानाजी करंजकर, अभियंता आर. सी. यादव, रमेश गायकर, चंद्रकांत गोडसे, विलास आडके उपस्थित होते.