आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरफोडीतील संशयित परराज्यात जेरबंद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- गंगापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या घरफोडीतील तिघा संशयितांना गुन्हे शाखेच्या पथकाने उत्तर प्रदेश तामिळनाडू राज्यातून ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून ९२० ग्रॅम सोन्यासह चांदी सात लाखांची राेकड असा २७.५० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. संशयितांमध्ये सराफ व्यावसायिकाचाही समावेश आहे. अलीकडच्या काळात पोलिसांचे हे पहिलेच सर्वात माेठे यश असल्याने खुद्द पोलिस आयुक्तांनीच पत्रकार परिषदेत याची माहिती दिली.
रामेश्वरनगरातील ‘यमुना कृपा’ बंगल्यातून लाखो रुपयांचा ऐवज लांबवल्याच्या घटनेबाबत आयुक्तांनी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना सक्त आदेश दिले होते. गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक रवींद्र साळुंके यांना मिळालेल्या माहितीनुसार स्वतंत्र पथक संशयितांच्या शोधार्थ पाठवले. उत्तर प्रदेशातील कुशीनगर पोलिसांच्या मदतीने संजय राजभर (रा. अशोकनगर, सातपूर) तामिळनाडू पोलिसांच्या मदतीने डॉ. राजू स्वामी यांस चेन्नई येथून ताब्यात घेतले. देवळाली कॅम्प येथील सराफी व्यावसायिक नंदू बोराडे यास अटक केली आहे. यातील चौथा आरोपी गणेश भंडारे फरार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. पत्रकार परिषदेस गुन्हे शाखेच्या पोलिस उपायुक्त एन. अंबिका, पोलिस उपायुक्त पंकज डहाणे, सहायक पोलिस आयुक्त सचिन गोरे उपस्थित होते.
श्रीमंत लोक म्हणून घरफोड्या : सध्या शहरात गंगापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत जास्त घरफोड्या होत आहेत. याचे कारण पोलिस आयुक्तांना विचारले असता ‘गंगापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत जास्त श्रीमंत लोक राहतात म्हणून घरफोड्यांचे प्रमाण जादा असल्याचे कारण त्यांनी सांगितले.
हा मुद्देमाल केला हस्तगत
९२० ग्रॅम सोने,
७४० ग्रॅम चांदी,
७ लाखांची रोकड
३ लेडिज घड्याळे
असे होते पथक
पोलिस निरीक्षक राजेंद्र कुटे, गुन्हे शाखेचे निरीक्षक संजय सानप, सहायक निरीक्षक रवींद्र साळुंके, सहायक पोलिस निरीक्षक गंगाधर देवडे, उपनिरीक्षक नितीन कामे, दादा गांगुर्डे, छगन सोनवणे, रवींद्र पिंगळे, संजय ताजणे, देवकिसन गायकर, विजय पगारे, गणेश घारे, राजेंद्र निकम, सुभाष गुंजाळ, विलास गांगुर्डे, मोहन देशमुख, इरफान शेख.
बातम्या आणखी आहेत...