आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंदिरानगर पोलिसांची पीडितेस अरेरावी, महिलेची निरीक्षकाकडून उलटतपासणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडको- एकीकडे नाशिक पोलिसांच्या वतीने नागरिक पोलिस सुसंवाद उपक्रम राबवून गुन्हेगारी नियंत्रणासाठी प्रयत्न केला जात असून, यासाठी खुद्द पाेलिस अायुक्तांकडून अावाहन केले जात अाहे. मात्र, प्रत्यक्षात इंदिरानगर पाेलिस ठाण्यात तक्रारदारांना नेहमीच वेगळा अनुभव येत असल्याचे पुन्हा एकदा उघडकीस अाले अाहे.
मुलीला फूस लावून पळवून नेणाऱ्या युवकाने त्याच्या मित्रांनी बदनामी केल्याचा अाराेप करीत थेट मुलीच्या घरात घुसून तिच्या अाई भावालाच बेदम मारहाणीची घटना घडली. या प्रकारात पाेलिसांकडे न्याय मागण्यासाठी गेलेल्या या कुटुंबीयांना मात्र इंदिरानगरच्या कर्तव्यदक्ष वरिष्ठ अधिकाऱ्याने अरेरावी करीत त्यांचीच उलटतपासणी केल्याचा संतापजनक प्रकार घडला.
पाथर्डी फाटा परिसरात राहणारे एक कुटुंब काही दिवसांपासून दहशतीच्या छायेत असून, त्यांच्यावर टाेळक्याने हल्ला केल्याचे वृत्त परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांना समजले. त्यानुसार, मंगळवारी सकाळी ११ वाजता ते या कुटुंबीयांच्या घरी पाेहोचले असता, महिला त्यांचा मुलगा घाबरलेल्या अस्वस्थेत रडत बसलेले हाेते. त्यांच्याकडून घटना समजून घेत त्यांना धीर देत इंदिरानगर पोलिस ठाण्यात त्यांना आणले. महिला तिचा १३ वर्षीय मुलगा अशा दाेघांनी तक्रार मांडण्यासाठी वरिष्ठ निरीक्षक हेमंत सावंत यांच्या दालनात धाव घेतली. अपेक्षेप्रमाणे वरिष्ठ गर्दी बघून प्रकाराबाबत अास्थेने चाैकशी करतील असे वाटले. परंतु, एखादा सराईत गुन्हेगारच टाेळक्यासह अाला अाहे, अशा अाविर्भावात त्यांनी माेठ्या अावाजात विचारले, काय काम आहे? चला बाहेर व्हा, ज्यांची तक्रार आहे ज्यांना मारहाण झाली त्यांनीच अात या, अशी सुरुवात केली. महिलेने घटना कथन केली तसेच टाेळक्याने मारहाण केल्याने झालेल्या दाेघांच्या अंगावरील, जखमाही दाखविल्या. तरीही वरिष्ठांनी माराहण हाेऊन तीन दिवस उलटले, तेव्हाच यायचे हाेते, अाम्हाला काही हेच कामे अाहेत का? त्यावर महिलेने गयावया करून हात जाेडत मदतीची याचना केली. पण, कर्तव्यदक्ष अधिकारी त्यांच्या ताेऱ्यातच कायद्याच्या बाहेर जाऊन काही करताच येत नाही, असे म्हणत तिकडेच चाैकीत तक्रार द्या, असे सांगत त्यांना घरचा रस्ता दाखविला.

निलंबनाचे विस्मरण
याच वरिष्ठ निरीक्षकांचा कायद्याचा अभ्यास लक्षात घेत तत्कालीन पाेलिस अायुक्तांनी त्यांच्यावर केलेल्या निलंबनाच्या कारवाईचाही विसर पडल्याचे दिसून येत अाहे. एका गंभीर गुन्ह्यातील अाराेपीचे दाेषाराेपपत्र मुदतीत पाठविल्याने त्यांच्यावर न्यायालयाने ताशेरे अाेढले हाेते. हेच महाेदय बाेगदा बंद प्रकरणातील अांदाेलनकर्त्यांना लाेकप्रतिनिधींच्या घरासमाेरच अांदाेलनाचा इशारा देत वादग्रस्त ठरले हाेते. तरीही पाेलिस अायुक्तांकडून त्यांना पाठीशी घातले जात असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला अाहे.

न्याय मिळावा
शहरात सोशल मीडियावर या महिलेच्या मुलीच्या विवाहाच्या बाबतीत अनेक प्रकारच्या पोस्ट पसरत असून, त्यातून काहीही गंभीर प्रकार घडू शकताे. त्याची पोलिस यंत्रणेकडून स्वत:हून दखल घेण्याचे काम असताना त्याकडे दुर्लक्ष करीत ज्या कुटुंबीयांची मानहानी होत आहे, त्यांनीच पाेलिसांकडे संरक्षणाची मागणी केल्यावर त्यांनाही हुसकावून लावले जाते, हा प्रकार निषेधार्ह अाहे. वरिष्ठ निरीक्षकांची योग्य चौकशी करून महिलेला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी आमदार जितेंद्र आव्हाड युवा फाउंडेशनचे अध्यक्ष बाळा दराडे यांनी केली आहे.
बातम्या आणखी आहेत...