आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘कन्येचा सन्मान हीच आमची शान’ अभियान आजपासून

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - मुलींचे भविष्य सुरक्षित करण्याच्या उद्देशाने आर्ट ऑफ लिव्हिंग व युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने देशभरात सुरू असलेले ‘कन्येचा सन्मान हीच आमची शान’ या प्रतिज्ञा अभियानास सोमवार( दि. 23)पासून शहरात प्रारंभ होणार आहे. या अभियानास दैनिक ‘दिव्य मराठी’चे सहकार्य लाभणार असून, शहरातील शाळाशाळांमध्ये आठवडाभरात त्याअनुषंगाने जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

या अभियानाच्या माध्यमातून ‘छळ व हिंसा, शिक्षण, कुपोषण, स्त्रीभ्रूणहत्या आणि बालविवाह’ या पाच विषयांवर आधारित प्रतिज्ञापत्र सर्व वयोगटांतील नागरिकांकडून भरून घेतले जाणार आहेत. सोमवारी सकाळी 7 व 12 वाजता गंगापूररोड येथील आनंदवल्ली परिसरातील मातोर्शी राधाबाई शांताराम वावरे या शाळेत हे अभियान राबविले जाणार असून, या शाळेतील विद्यार्थ्यांकडून प्रतिज्ञापत्र भरून घेतले जाणार आहे. तसेच, प्रत्येक विद्यार्थ्याला पाच अर्जांचे वाटप करून त्यांचे कुटुंबीय तसेच शेजारच्यांकडून हे प्रतिज्ञापत्र भरून घेतले जाणार आहे.

कोट्यवधी लोकांनी केलेल्या प्रतिज्ञेने कृतीमध्ये आणि वृत्तीमध्ये परिवर्तन होते, या उद्देशाने राबविण्यात येणार्‍या या महत्त्वपूर्ण अभियानाच्या माध्यमातून ‘कन्येचा सन्मान’ केला जाणार आहे.

बालिकांचे भविष्य सुरक्षित करणारे प्रतिज्ञापत्र
विवाहासाठी आवश्यक कायदेशीर वयोर्मयादा, कमी वयोर्मयादेची सून घरी न आणणे, कमी वयोगटातील विवाहांना हजर न राहणे, हुंडा देणार नाही तसेच घेणार नाही, गर्भलिंग चाचणी करू देणार नाही, असे प्रकारांना प्रतिबंध करणे, मुलींच्या हक्कासाठी पाठपुरावा करणे, चांगले शिक्षण, पोषक आहार आणि सुरक्षा, मुली व महिलांचा आदर, हिंसेला प्रतिबंध, समाजात महिला व मुलींचा आदर, असे प्रश्न असलेले प्रतिज्ञापत्र विद्यार्थी, मुले व तरुणांकडून भरून घेतले जाणार आहे.

अभियान सर्व शाळांमध्ये
शहरातील सर्व शाळांमध्ये हे अभियान राबविले जाणार असून, या अभियानात सहभागी होण्यासाठी शाळांनी सूरज 9970113040 व स्वप्नील 9096904191 यांच्याशी वरील क्रमांकांवर संपर्क साधावा.