आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Art Of Living Help To Control Of Drought In Maharashtra

आर्ट ऑफ लिव्हिंगचेही दुष्काळ निवारण; सुमारे 290 किमीची कामे पूर्ण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- तीव्र दुष्काळाची दाहकता लक्षात घेऊन नैसर्गिक स्रोतांना पुनर्जीवित करण्याचे काम आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे राज्यातील जिल्ह्यांत सुरू असून, आतापर्यंत १३ नद्या, ७५ नाले-ओढे, १८ तलाव आणि एका धरणाचा समावेश आहे.

लोक सहभागातूनच ही लोकचळवळ उभी करत जवळपास २९० किमीचे काम झाले असून, ६० किमीचे काम पुढील दीड ते दोन महिन्यांच्या कालावधीत केले जाणार असल्याचे आर्ट ऑफ लिव्हिंगचे मकरंद जाधव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

मागील ते वर्षांपासून दुष्काळाशी सामना करत असलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आर्ट ऑफ लिव्हिंग सरसावली आहे. या प्रामुख्याने बुजलेल्या नद्या, नाले, कालवे, विहिरी, तलाव, बंधारे अशा विविध नैसर्गिक स्रोतांना लोकसहभागातून पुनर्जीवित करण्याचे काम आर्ट ऑफ लिव्हिंगच्या स्वयंसेवकांनी श्री श्री रविशंकर यांच्या आदेशाने ‘व्हॉलेंटियर फॉर बेटर इंडिया’ या प्रकल्पांतर्गत असलेल्या ‘जलजागृती’ अभियानाच्या माध्यमातून एप्रिल २०१३ पासून लातूरमधून सुरू केले. लातूर जिल्ह्यातील घरणी नदीचे खोलीकरण, रुंदीकरण आणि गाळ काढण्याचे काम पूर्ण करण्यात आले. जनता आणि आर्ट ऑफ लिव्हिंगने खर्चाचा अर्धा-अर्धा भार उचलत कामे पूर्ण केली. त्याचा फायदा पहिल्याच पावसात नदी पाण्याने तुडुंब भरली.

आसपासच्या विहिरी पाण्याने भरल्या. नदीतील गाळ शेतात पसरविल्यानेे शेतजमिनीचा पोत सुधारला. त्यानंतर गेली तीन वर्षे राज्यातील नऊ जिल्ह्यांत युद्धपातळीवर अनेक नद्या, तलाव नाले यावरही जलसंधारणाची कामे पूर्ण झाल्याचे जाधव यांनी सांगितले.

टंचाईग्रस्त लातूरमधील ४० गावे, उस्मानाबादमधील तीन नद्या, जालन्यातील किलाेमीटर गाळ उपसण्याचे काम पूर्ण झाले अाहे. तसेच २५ हून अधिक नाल्यांचे काम, नागपूर ६८ किमी नाल्याचे खोलीकरण, रुंदीकरणाचे काम, १३ नवीन तलावांचे काम पूर्ण झाले आहे. अमरावतीत ३२ किमी लांबीच्या नाल्याचे काम, जळगाव, सातारा जिल्ह्यात नद्यांची मिळून २९० किमीची कामे झाली आहेत.