आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हसत-खेळत व्यक्तिमत्त्व विकास, हस्तकला, चित्रकला, गायनात रमल्या विद्यार्थिनी...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - टाकाऊ वस्तू तसेच कागदी पिशव्यांपासून तयार केलेल्या विविध हस्तकलेच्या आकर्षक वस्तू, रांगोळीचा आविष्कार, चित्रकला, संस्कृत श्लोक, नाट्यसंवाद, संगीत, गायन अशा विविध कलाविष्कारांच्या माध्यमातून विद्यार्थी उन्हाळी सुटीमध्ये व्यक्तिमत्त्व विकासाचे धडे गिरवत आहेत.
नाशिक एज्युकेशन सोसायटी संचलित मातोश्री रामप्यारीबाई सारडा कन्या विद्यामंदिर शाळेत व्यक्तिमत्त्व विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ११ ते १७ एप्रिल या कालावधीत या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी ११ ते या वेळेत इयत्ता चाैथी ते नववीच्या विद्यार्थिनींना व्यक्तिमत्त्व विकासाची संधी मिळावी, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले अाहे. शिबिरात शंभराहून अधिक विद्यार्थिनींनी सहभाग घेतला आहे. या विद्यार्थिनी रांगोळीच्या अाकारांतून विविध आकर्षक प्रकार साकारत सर्वांचेच लक्ष वेधून घेत हाेत्या. विशेष म्हणजे, मुलींनी घरगुती टाकाऊ वस्तूंचा कल्पकतेने वापर करून त्यापासून अनेक टिकाऊ वस्तूही तयार केल्या. विद्यार्थिनींत कला संगीताची आवड निर्माण व्हावी, यासाठी वाद्यवृंदाकडून संगीताचे धडेदेखील शिबिरार्थींना दिले जात आहेत. नाट्यसंवादाच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रबोधनात्मक संदेशही या विद्यार्थिनी देतात. शिबिरात मुलांनी बनवलेल्या सर्व वस्तूंचे शनिवारी (दि. १८) प्रदर्शन भरविणार अाहेत.
शिक्षकांकडून मिळतात कौशल्यप्राप्तीचे धडे
मातोश्रीरामप्यारीबाई सारडा कन्या विद्यामंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका गीता कुलकर्णी, उपमुख्याध्यापिका अाशा डावरे, पर्यवेक्षिका सुनंदा जगताप, संध्या जोशी, मनोहर कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर होत असून, शिक्षक ओमकार वैरागकर, मनीष जोगळेकर, संगीता गारोळे, मनीषा देशपांडे, स्वाती काळे, उमा राठी, अतुल भालेराव, कल्याणी कुलकर्णी आदी शिक्षक विद्यार्थिनींना व्यक्तिमत्व विकासाचे प्रशिक्षण देतात.
ज्ञानात भर पडली
घरातील उपयोगात नसलेल्या वस्तू आणून अाम्ही विविध वस्तू तयार केल्या आहेत. आकर्षक वस्तू कशा तयार करायच्या याची माहिती मिळाल्याने नवीन शिकण्याची संधी मिळाली. अनुजा वाघ, विद्यार्थिनी