आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीव धाेक्यात, पण दराेडेखाेर यमसदनी, राष्ट्रपतींकडून शाैर्य पदकाने सन्मानित

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
१९८८मध्ये पाेलिस खात्यात उपनिरीक्षक पदावर दाखल झालेल्या संजय देशमुख यांनी निफाड, लासलगावसह ठाणे, नागपूर जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव पाेलिस ठाण्यात प्रमुखपदावर धडाकेबाज कामगिरी बजावली. १०० हून अधिक गंभीर गुन्ह्यांत उत्कृष्ट तपास करीत अाराेपींना शिक्षेपर्यंत पाेहोचविण्यात त्यांना यश अाले अाहे. दराेडेखाेरांची टाेळी पकडण्याबराेबरच जिवाची पर्वा करता दाखविलेल्या शैार्याबद्दल शासनाने देशमुख यांची दखल घेत त्यांना २००६ मध्ये राष्ट्रपती पदकाने गाैरविण्यात अाले अाहे.
निफाड तालुक्यात खेडाेपाडी, वस्त्यांवर, व्यापारी पेट्राेलपंपांवर दराेड्याचे सत्र सुरू हाेते. त्यातच लासलगाव पेट्राेलपंपावर मध्यरात्री दराेडा टाकून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या दराेडेखाेरांच्या गाडीवर पाेलिसांची नजर पडली अाणि तब्बल २० ते ४० किलाेमीटरपर्यंत मळ्याखळ्यात सुरू झालेल्या दराेडेखाेरांचा पाठलाग चार तासांनी संपविला ताे तत्कालीन पिंपळगाव बसवंत पाेलिस ठाण्याचे प्रमुख सध्याचे नाशिकराेड पाेलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय देशमुख यांनी. जिवाची पर्वा करता दराेडेखाेरांचे चाॅपरचे वार अंगावर झेलतानाच त्यांच्या मुसक्या अावळण्यासाठी प्रसंगी गाेळीबार करीत एकाला यमसदनी धाडले, तर दाेघांना जिवंत पकडण्यात ते यशस्वी ठरले.

२००३ मधील ही घटना. पिंपळगाव बसवंत गावात रात्री गावातून एक फेरी गस्तीची मारून पाेलिस ठाण्यात देशमुख काम करत हाेते. मध्यरात्री अडीच वाजता बिनतारी संदेशयंत्रणेद्वारे संदेश प्राप्त झाला की, अाताच लासलगाव पेट्राेलपंपावर दराेडा पडला. दराेडेखाेरांनी एेवज लुटून पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण करीत सुमाे जीप (क्र. ४४४४)मधून पळाले. त्यांचा पाेलिस कर्मचारी पाठलाग करीत असून, ते निफाडच्या दिशेने पळाले अाहेत. त्याचवेळी कुठलाही विलंब करता गस्तीवरील पथकाला बाेलावून घेत कंबरेला पिस्तूल लावून चाैघा कर्मचाऱ्यांना साेबत घेतले. निफाडहून लासलगावच्या दिशेला निघतानाच लासलगाव पाेलिसांकडून दराेडेखाेरांचे वर्णन, त्यांची भाषा, इतर चाैकशी केली. यात पाच ते सहा दराेडेखाेर गाडीत असून, त्यांच्याकडे शस्त्रे असण्याचा संशय अाहे. मात्र, या टाेळीतील एक दराडेखाेर गाडीत बसतानाच खाली पडल्याने त्याने अंधाराचा फायदा घेत मळ्याखळ्यातून पसार झल्याचे समजले. गाडीचा क्रमांक ४४४४ हा पक्का लक्षात ठेवत जीपचालकाला अाणि कर्मचाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या, खात्यात अशी संधी वारंवार येत नाही. िशकार समाेर येताच कुठलीही पर्वा करता त्यांच्यावर तुटून पडा. एकही पळाला नाही पाहिजे. हातात पिस्तूल, काठ्या असून, गरज पडल्यास त्याचाही वापर करा, पण साेडू नका, अशा शब्दात सूचना दिल्या. ताेपर्यंत पुन्हा एकदा दराेडेखाेरांनी दिशा बदलल्याची माहिती नियंत्रण कक्षातून मिळाली. त्याप्रमाणे दराेडेखाेर रानवड मार्गावरून काेटमगावकडे पळाले. त्या दिशेने जीप वळवितानाच अंधारात समाेरून एक जीप येताना दिसली. चालकाला लाइट बंद करून अचानक सुरू करण्यास सांगितले, तर दराेडेखाेरांचीच जीप दिसली. त्याने थेट सुमाेवर जीप नेण्याचा प्रयत्न करताच त्याने बाजूला घेतली. त्याचक्षणी देशमुख यांनीही चालत्या गाडीतून बाहेर उडी मारून सुमाेरच्या चाकांवर गाेळी झाडली. तरीही सुमाेचालकाने सुसाट गाडी पळविली. त्यांचा पुन्हा पाठलाग सुरू केला. दुर्दैवाने देशमुख यांचे पिस्तूल ब्लाॅक झाल्याने गाेळ्या बाहेर पडत नव्हत्या. त्यांनी पाठलाग सुरू असतानाच पिस्तूल दुरुस्तीचा प्रयत्न केला. परंतु, काहीही हाेत नव्हते. पालखेड चाैकात पाेलिस पथक अाले. प्रातर्विधीला जाणाऱ्या एका ग्रामस्थाला थांबविताच त्याने निरीक्षक देशमुख यांना विचारण्यापूर्वीच सुमाे या दिशेने गेल्याचे सांगितले. तिथून चार किलाेमीटरवर पुन्हा चाैफुली लागली. पुन्हा पेच निर्माण झाला. तेव्हाच ट्रॅक्टरचालकाने ती गाडी सुसाट शिरवाडे वणीच्या दिशेने गेल्याचे सांगितले. पुन्हा चाेर-पाेलिस असा खेळ सुरू झाला. सुमाेचे टायर पंक्चर झाल्याने दहा ते पंधरा किलाेमीटरपेक्षा जास्त अंतर कापू शकत नसल्याचे नियंत्रण कक्षास कळविले. एकाचवेळी ५० ते ६० कर्मचाऱ्यांचे वेगवेगळे पथके शाेधमाेहीम राबवित असताना शिरवाडेच्या अलीकडेच एका ढाब्यालगत अंधारात सुमाे उभी दिसली. दराेडेखाेरांना समजण्यापूर्वीच पाेलिस गाडी अाडवी लावली. मात्र, त्यांनी लागलीच शेजारच्या नाल्यात उड्या मारून अंधारात पळाले.

दराेडेखाेरांच्या मागे देशमुख कर्मचाऱ्यांनीही उड्या घेतल्या. एकाला देशमुखांनी जमिनीवर लाेळवताच त्याने उलट हल्ला केला. त्याने शर्टमधून चाॅपर काढत त्यांच्या पाेटात खाेपसला. सेकंदात रक्ताच्या थाराेळ्यात काेसळलेल्या देशमुखांना चक्कर अाल्याने काही दिसेनासे झाले. हे बघून इतर कर्मचारी त्यांच्या मदतीला धावले. परंतु, देशमुखांनी त्यांना समाेरच्यांना पकडा, मला साेडा असे फर्मान साेडले. तर दराेडेखाेराने जवळच पडलेला दगड उचलून पुन्हा देशमुखांच्या डाेक्यात टाकणार ताेच त्यांनी कंबरेला खाेचलेले पिस्तूल काढून सलग चार ते पाच गाेळ्या झाडल्या. सुदैवाने त्यांचे पिस्तूल सुरू हाेऊन गाेळ्या उडाल्या, अन्यथा देशमुखांच्या गाेळीबाराचा अावाज एेकून जवळच असलेला दराेडेखाेरही जागेवरच थांबला. जखमी दराेडेखाेर देशमुख यांना तातडीने चांदवड रुग्णालयात दाखल केले. उपचारापूर्वीच दराेडेखाेरांचा मृत्यू झाला. देशमुख यांच्यावर शस्त्रक्रिया करून १५ दिवसांनंतर रुग्णालयातून घरी साेडण्यात अाले. ही संपूर्ण दराेडेखाेरांची टाेळी उघडकीस अाणून त्यांच्याविरुद्ध जवळपास २५ ते ३० दराेडे दाखल असल्याचे लक्षात अाले. त्यांच्याकडून लाखाेंचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पाेलिसांना यश अाले. अहमदनगर जिल्ह्यातील सराईत दराेडेखाेरांची ती टाेळी हाेती.
नाशिक. रविवार, २६ जून २०१६ |
बातम्या आणखी आहेत...