आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO : नाशकात कृत्रिम पावसाचाही दगा; ढगातून नाही डोळ्यांतून पाणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्‍हीडिओ पाहण्‍यासाठी फोटाेमध्‍ये क्लिक करा - Divya Marathi
व्‍हीडिओ पाहण्‍यासाठी फोटाेमध्‍ये क्लिक करा
नाशिक – यंदा पावसाने दीर्घ दडी मारली. त्‍यामुळे शेतातील पीक वाचण्‍यासाठी शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून आज (सोमवार) कृत्रिम पाऊस पाडण्‍याचा निर्णय घेतला. त्‍यासाठी येवला तालुक्यातील सायगावची निवड करण्‍यात आली होती. त्‍या दृष्‍टीने सकाळी 7 वाजताच्‍या सुमारास विमानांच्‍या सहाय्याने पाच रॉकेटचा मारा करण्‍यात आला. पण, तो अपयशी झाला. त्‍यामुळे ‘पैसा झाला मोठा; पाऊस झाला खोटा’ या उक्‍तीचा प्रत्‍यय आला. दरम्‍यान, नऊ वाजताच्‍या सुमारास सायगाव परिसरात ऊनही पडले होते. त्‍यामुळे शेतक-यांच्‍या आशेवर पाणी फेरले असून, प्रयोग तूर्तास थांबवण्‍यात आला आहे.
अजून पाच रॉकेट सोडणार
या परिसरात आकाशात ढग दिसताच अजून पाच रॉकेट सोडली जाणार आहेत. हा प्रयोग यशस्वी ठरल्यास साधारणपणे 20 किलोमीटरच्या परिघात 45 मिनिटात पाऊस पडणांच्‍या आत पाऊस पडेल, असा अंदाज आहे.
चीनमध्‍ये गरज तेव्‍हा पाऊस; भारतात केवळ प्रयोग
कृत्रीम पाऊस पाडता येईल, यावर १९४६ पासून संशोधन सुरू होते. पुढे त्‍यात यश आले. जगातल्‍या 50 देशात कृत्रीम पाऊस पाडला जातो. पण, भारतात अजून प्रयोगाच्‍या पुढे सरकारला नाही. जगात सर्वाधिक कृत्रिम पाऊस चीनमध्‍ये पाडला जातो. तिथे यासाठी विमानासोबतच लढाऊ तोफांचाही वापर केला जातो.
पुढील स्‍लाइडवर वाचा कसा पडतो कृत्रिम पाऊस...