आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

..अन‌् राॅकेटची हवा झाली ‘गुल’, माेहीम फसली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
येवला- सायगाव येथील कृत्रिम पावसाची माेहीम अखेर अयशस्वी ठरली. हवामानाचा अंदाज, आकाशातील बाष्पयुक्त ढगांची अनुकूलता याचा अभ्यास करत सोडलेल्या सात राॅकेटपैकी केवळ एकच राॅकेट यशस्वी ठरले. मात्र, याही राॅकेटने कृत्रिम पाऊस पडल्याने अखेर येवलेकरांच्या पदरी निराशाच पडली.
मुंबई इंटरनॅशनल स्कूल आॅफ प्रोफेशनल स्टडिज हिंद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारपासून दोन दिवस सायगाव फाट्यावर कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी मोहीम सुरू होती. रविवारचा संपूर्ण दिवस कृत्रिम पावसाला लागणारे आवश्यक ढग जमल्याने हा प्रयोग स्थगित करण्यात आला होता. यामुळे आयएसपीएस संस्थेचे कर्मचारी, प्रांताधिकारी वासंती माळी, तहसीलदार शरद मंडलिक, कृषी अधिकारी अशोक कुळधर, अभय फालके यांच्यासह सोमवारी सकाळी वाजता सायगाव फाट्यावर मोहीम फत्ते करण्यासाठी हजर झाले. राॅकेट लाँचरसाठी सर्व सेटअप तयार करून हवामानाचा अंदाज घेतला. आकाशातील ढगांची चाचपणी केली.

..अन्अखेर राॅकेट उड्डाणासाठी सज्ज झाले
राॅकेटउड्डाणासाठी सज्ज झाल्यानंतर सकाळी वाजता मोहिमेच्या चाचणीला सुरुवात झाली. सर्वांच्या नजरा उड्डाणाकडे लागल्या होत्या. वाजून मिनिटांनी पहिले राॅकेट हवेत झेपावले. मात्र, क्षणातच ते तिरपे होऊन जमिनीवर काेसळले. यानंतर वाजून मिनिटांनी दुसरे रॉकेट हवेत सुसाट वेगाने झेपावले. ते अखेर यशस्वी होऊन ढगांमध्ये जात ब्लास्ट झाले.

यशस्वी झालेल्या राॅकेटने पथकाची आशा मात्र काहीअंशी चेहऱ्यावर झळकलेल्या स्मितहास्याने वाढली होती. यामुळे मोहीम यशस्वी होणार, असा विश्वास निर्माण करीत पथकाने वाजून २० मिनिटांनी तिसरे राॅकेट सोडले. मात्र, ते जागेवरच फुटले. यानंतर वाजून ५० मिनिटांनी चौथे, वाजून ३५ मिनिटांनी पाचवे, ११ वाजता सहावे, तर ११ वाजून १४ मिनिटांनी सातवे राॅकेट पथकाने साेडले. मात्र, सर्वच राॅकेट ढगांपर्यंत जाण्यास अयशस्वी झाल्याने पथकासह उपस्थितांच्या पदरी निराशा पडली.

पुन्हा राबविणार माेहीम
कृत्रिमपावसाची दाेन दिवसाची माेहीम अयशस्वी झाल्यानंतर अाता या पथकाने सायगावातच राहून दाेन दिवस परिस्थितीचा अभ्यास करण्याचे ठरविले अाहे. परिस्थितीचा अभ्यास केल्यानंतर पुन्हा पंधरा दिवसांनी परिस्थितीला अनुकूल अशा उंचीचे राॅकेट माेहिमेसाठी अाणू, असा विश्वास अायएसपीएस संस्थेचे विश्वस्त अब्दुल रहेमान वनू यांनी पत्रकारांशी बाेलताना व्यक्त केला आहे.

ढगांची उंची अधिक, हवेच्या जास्त वेगाचा परिणाम
ढगांची उंची अधिक असल्याने तसेच हवेचा वेग माेठ्या प्रमाणात राहिल्याने चार किलाेमीटर उंचीवर जाणारे ग्यान अंजली हे राॅकेट अयशस्वी झाल्याचा दावा पथकाने या वेळी केला.

एक रॉकेट यशस्वीरीत्या उडाले, परंतु पडलाच नाही पाऊस...
माेहिमेंतर्गतजे राॅकेट ढगांमध्ये जाऊन फुटले. त्या राॅकेटमुळे दाेन तासांपर्यंत पाऊस पडेल, असा अंदाज पथकातील कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला हाेता. मात्र, परिसरात कुठेही पाऊस पडला नाही. पथकातील कर्मचाऱ्यांसह उपस्थित शासकीय अधिकारीही या राॅकेटच्या निकालाचा शाेध फाेनद्वारे घेत हाेते. पुन्हादीड तासाच्या विश्रांतीनंतर सहावे रॉकेट सोडण्यात आले. परंतु, तेदेखील अपयशी ठरले. यामुळे मात्र घोर निराशा झाली. सतत अपयश आल्याने तासाभराच्या विश्रांतीनंतर पाचवे रॉकेट आकाशात सोडण्यात आले. चौथेरॉकेट आकाशात सोडण्यात आले. ते यशस्वीरीत्या आकाशात झेपावेल अशी आशा होती. परंतु, ती फोल ठरली. तिसरे रॉकेट सोडण्यात आले. मात्र, ते जागेवरच फुटले. यामुळे पुन्हा पथकाच्या पदरी मोठी निराशा आली.
दुसरेरॉकेट हवेत सुसाट वेगाने झेपावले. ते यशस्वी झाले. ते ढगात जाऊन फुटले. यामुळे सर्व आनंदित झाले होते.
पुढील स्‍लाईडवर क्‍लिक करून पाहा, प्रयोगाचे फोटो..