आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Artificial Sand Using For Building Issue At Nashik, Divya Matathi

बांधकामात कृत्रिम वाळूचा सर्रास वापर, ठेकेदाराचे पितळ उघड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- गौण खनिजावरील मंदीचे सावट हटले असले तरी महापालिकेकडून सुरू असलेल्या बहुतांश बांधकामांमध्ये अद्यापही याच नावाखाली आर्टिफिशियल (कृत्रिम) वाळूचा सर्रासपणे वापर सुरू आहे. अशाच प्रकारे या वाळूचा वापर सुरू असलेल्या इंदिरानगरमधील बांधकामाचे पितळ खुद्द नगरसेवक आणि तेथील जनतेच्या जागरूकतेमुळे उघडे पडले आहे.
साधारण गेल्या वर्षभरापूर्वी केंद्र शासनाच्या पर्यावरण विभागाने सर्वच दगड खाणींवरील खोदकामास बंदी घातली होती. पर्यावरणदृष्ट्या योग्य त्या नियम व अटींची पूर्तता होत नाही तोपर्यंत ही बंदी कायम होती. यामुळे सरकारी, तसेच खासगी क्षेत्रातील विविध बांधकामांवर त्याचा विपरीत परिणाम झाला होता. चोरट्या मार्गाने दगड, कच व वाळूची विक्री चढय़ा दराने होत होती. याचा सर्वाधिक फटका बसला होता तो शासकीय विकासकामांना. त्यामुळे शासनाने जिल्हा प्रशासनाला, तसेच महापालिकेने आपापल्या बांधकामांमध्ये 50 टक्के आर्टिफिशियल वाळू बांधकामांमध्ये वापरण्यास संमती दिली होती. या परवानगीमुळे कामे सुरू तर राहिली, मात्र आता खाणींवरील बंदी उठून वर्ष लोटले तरी काही ठेकेदारांकडून मात्र या नावाखाली अजूनही बांधकामांसाठी आर्टिफिशियल वाळूचाच वापर केला जात असल्याची बाब इंदिरानगरमधील एका बांधकामाच्या निमित्ताने समोर आली आहे. महापालिकेतील बांधकाम विभागातील अभियंत्यांकडून त्याकडे काणाडोळा केला जात असल्यानेच हा फसवेगिरीचा उद्योग सुरू असल्याचे नगरसेवकांचे म्हणणे आहे.

आर्टिफिशियल वाळूमुळे नुकसान : अशा प्रकारची वाळू बांधकामांमध्ये वापरली जात असल्याने त्याचा आर्थिक फटका हा महापालिकेला, पर्यायाने नागरिकांच्याच खिशाला बसतो. त्याशिवाय या वाळूमुळे बांधकाम पक्के होत नाही. पाणीही खूप लागते. पोकळ बांधकामामुळे त्यात उंदीर, सर्प यासारखे सरपटणारे प्राणी बिळ करून राहतात. तीन ते चार वर्षांच्या कालावधीमध्येच बांधकामाला भेगा पडून ते ढासळून जात असल्याच्या तक्रारी नगरसेविका दीपाली कुलकर्णी व नगरसेवक यशवंत निकुळे यांनी केल्या आहेत.