आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्थसंकल्प आणि आपलं आर्थिक नियोजन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बरेच युवक-युवती अर्थसंकल्पाकडे "मला काय करायचं' या वृत्तीने पाहतात. पण, आपण अर्थसंकल्प ऐकला पाहिला पाहिजे. अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर वृत्तपत्रांत सर्व माहिती संकल्पित स्वरुपांत असते. तिची नोंद घ्यावी हे वर्तमानपत्र सबंध वर्षभर सांभाळावं. हे करायचं नसेल, तर आयकराविषयीची माहिती लॅपटॉपमध्ये सेव्ह करावी वेळोवेळी, प्रसंगी तिचा उपयोग करावा.
सन २०१६-१७साठीचा केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत, फेब्रुवारीअखेर सादर होणार आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडून सर्वच जण त्यांतही मध्यवर्गीय बऱ्याच अपेक्षा बाळगून आहेत. त्यांनी मात्र अर्थसंकल्प काहीसा कडक असेल, असं सूचित केलं आहे. कारणंही तशीच आहेत. बऱ्याच राज्यांत दुष्काळ आहे त्यामुळे कृषी उत्पादन वाढ खाली येऊन ती टक्क्यांवर येण्याची चिंता आहे. वित्तीय तूट टक्क्यांवर जाईल, असं दिसतंय. आर्थिक वाढीचा (जीडीपीचा) दर ७.२ टक्क्यावर रेंगाळण्याची चिन्हे आहेत. युरोपियन देश, जपान, अमेरिका, चीनमध्ये आर्थिक मंदीचे वातावरण आहे. जागतिक बाजारात इंधन तेलाचे भाव घटून २८ ते ३० डॉलर्स प्रती बॅरल एवढे उतरण्याचा आपल्याला चांगला लाभ झाला खरा, पण त्यांतून निर्यात घटली आहे. परदेशी गुंतवणूकी देशांतर्गत बाजारवृद्धीस प्रोत्साहन देण्याचं काम आपल्या सरकारला करावं लागणार आहे. त्यात भर म्हणजे सिरिया-जॉर्डन-इराक-इराणमध्ये वाढत्या दहशती कारवाया चिंताजनक गंभीर परिस्थिती निर्माण करत आहेत. आपल्यालाही अशा कारवायांना समर्थ तोंड देण्यासाठी दक्ष राहत वाढता संरक्षण खर्च करावा लागत आहे. अशा परिस्थितीत आपली उत्पादन रोजगार वाढीला चालना देण्याचं काम करणारा अर्थसंकल्प सादर करण्याचं कल्पक कौशल्य अर्थमंत्र्यांना दाखवायचं आहे.

अशा परिस्थितीत आपल्याला काय मिळेल, याची प्रतीक्षा जनसामान्यांना आहे. एक रास्त अपेक्षा आहे, ती म्हणजे जीवनावश्यक वस्तूंवर करवाढ होऊ नये त्यातून महागाई वाढू नये. दुसरी अपेक्षा असते की, आयकरांच्या दरांत वाढ होऊ नये त्याऐवजी बचतीस प्रोत्साहन देणाऱ्या सोयी-सवलती आयकर आकारणीत असाव्यात. आयकर किती भरावा लागेल, कर वाचवण्यासाठी किती गुंतवणूक करता येईल, करावी लागेल या विषयी अर्थसंकल्पात बदल, सुधारणा, तरतूदी काय आहे, ही माहिती अर्थसंकल्पांतून मिळते मिळवावी.

आयकराविषयी असं घडताना दिसतं की, आपल्या कष्टाच्या कमाइवरील आयकर, मालक किंवा त्याचा प्रतिनिधी सांगेल त्याप्रमाणे धोपटपणे भरून टाकतो. स्वतःचा व्यवसाय, उद्योग असला तरी बरेचजण वरवर पाहत आयकर भरतात. काही करसल्लागारांचे सल्ले घेतात. पण, स्वतः पूर्ण लक्ष घालत नाहीत. पण मालकांना आपलं इतर उत्पन्न, बचती, कौटुंबिक गरजा परिस्थिती पूर्ण माहीत नसते. करसल्लागारांनाही पूर्ण माहिती नसते कित्येकदा ती दिली जात नाही. गरजा, प्राधान्यक्रम, बचतक्षमता यांची माहिती लक्षात घेऊन करपात्र उत्पन्न, बचत, सवलती करदेयता ठरवणं लाभदायी असतं.

तसं हे काम अवघड नसतं. फक्त लक्ष घातलं पाहिजे. वेतन असेल तर सर्व भत्त्यांसह एकूण वार्षिक उत्पन्न काढावं. व्यवसाय असेल, तर निव्वळ नफा किती, याचा अंदाज करावा. त्यात बचतीवरील गुंतवणुकीवरील व्याज, भाडे (असल्यास) उत्पन्न, मानधन अन्य काही, मिळवावे. त्यातून करमाफ उत्पन्न (डिव्हिडंड वगैरे) उणे करावे म्हणजे निव्वळ उत्पन्न मिळतं. त्यातून कर वाचवण्यासाठी बचत किती करू शकू, करायची, ती रक्कम वजा करावी म्हणजे करपात्र उत्पन्न मिळतं. या उत्पन्नावर स्लॅबप्रमाणे किती टक्क्याने किती कर भरावा लागेल, याचा अंदाज करता येतो. या रकमेचा बारावा हिस्सा दरमहा वेतनातून कपात करण्यास सांगावं डिसेंबरच्या शेवटी आढावा घेऊन करकपात कमी अधिक करावी गुंतवणूक यासाठी थांबवावी किंवा वाढवावी. असं केलं तर कुठलिही अडचण येत नाही.

आपल्याला उत्पन्न आहे, म्हणून आयकर आहे तो भरणं हा कर्तव्याचा अभिमानाचा भाग आहे. पण, तो योग्य तेवढा, नेमका, वेळेवर भरण्यासाठी उपलब्ध सोयी-सवलती, तरतूदी, पद्धती यांची माहिती प्रारंभीच करून घ्यावी. म्हणजे मग घाई, ताण, त्रास होत नाहीत बचतीची गुंतवणूक, भविष्यकाळासाठी करबचतीबरोबर उद्दिष्ट्यप्रेरित लाभदायक करता येते!