आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अरुणा संगम गोमुख कुंडावर अखेर हातोडा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - रामकुंडावरीलअरुणा संगम गोमुख येथील कुंडाचे काँक्रिटीकरण महापालिकेने मध्यरात्री तोडले. अत्यंत कठीण बांधकाम असल्याने संबंधित ठेकेदाराने काम अर्धवट सोडून पळ काढला. गोदावरी नागरी सेवा समिती आणि पुरोहित संघाने श्रमदान करून कुंडातील माती, समिेंट आणि दगड बाहेर काढले. रामकुंड परिसरातील प्राचीन कुंड पुनर्जीवित करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान झाल्याचा आरोप गोदावरी नागरी समितीने केला आहे.

रामकुंड परिसरात १६ प्राचीन कुंड आहेत. हे कुंड पुनर्जीवित करण्यासाठी गोदावरी नागरी सेवा समितीचे देवांग जानी यांनी थेट उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. प्राचीन कुंडांतील पाण्याचे नैसर्गिक स्रोत सुरू करावेत, अशी याचिकेत मागणी करण्यात आली आहे. महंत ग्यानदास महाराज यांनीही रामकुंडातील नैसर्गिक पाण्याचे स्रोत पुनर्जीवित करण्यासाठी पालिकेने उपाययोजना कराव्यात, असे सूचित केले होते. यानंतर रामकुंडामध्ये बोअरवेलच्या साह्याने पाण्याचे स्रोत सुरू करण्याचा निर्णय झाला होता. यास महंतांसह गोदावरी नागरी सेवा समिती आणि पुरातत्व विभागाने आक्षेप घेतला होता.

सिंहस्थानंतर हा विषय गांभीर्याने घेतला जाईल, असे आश्वासन संबंधितांना दिले होते. बुधवारी मध्यरात्री अचानक मनपाने रामकुंडातील अरुणा संगम गोमुख कुंड बुजवण्याचा प्रयत्न केला. रामकुंड, सीताकुंड येथील सेतू तोडण्यात आला. कामगारांनी अथक प्रयत्न करूनही हा सेतू तोडण्यास अपयश आले. अखेर संबंधित ठेकेदाराने अर्धवट काम सोडून पलायन केले. सकाळी ही बाब पुरोहित संघाच्या आणि गोदावरी नागरी समितीच्या सदस्यांच्या नदिर्शनास आली. जागेचे पावित्र्य राखण्याकरिता सदस्यांनी श्रमदान करत कुंडातील मलबा बाहेर काढला. शाहीस्नानास अवघे पंधरा दविस शिल्लक असताना रामकुंड परिसरातील पक्के बांधकाम तोडण्यात आल्याने परिसरात गर्दीमध्ये मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे.

हे धोके वाढले...
पंचवटीतीलरामकुंड, सीताकुंडावरील सेतू तोडल्याने पाण्याचा वेग अधिक वाढेल. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यास अडचण निर्माण होऊ शकते. प्राचीन गोमुख कुंड तोडल्याने काही मीटर जागा वाढेल, मात्र पूर आल्यानंतर हा परिसरही पूर्णत: पाण्यात जातो.

कुंड तोडणे धोकादायक
प्राचीन अरुणा संगम गोमुख कुंड बुजवण्याचा प्रयत्न सुरू आहे. रामकुंड सीताकुंडावरील सेतू तोडल्याने रामकुंड परिसर अधिक धोकादायक बनला आहे. देवांगजानी, समन्वयक, गोदावरी नागरी