आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Arvind Kejriwal News In Marathi, AAP, Nashik Lok Sabha Constituncy, Divya Marathi

अखेर नाशकात केजरीवाल येणार व्हाया पुणे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - नाशिकला ‘आप’कडे असलेल्या आर्थिक चणचणीमुळे ‘आप’चे समन्वयक अरविंद केजरीवाल यांची 11 एप्रिलची नाशिकमधील सभा रद्द झाल्यानंतर आता पुण्यातील एका कार्यक्रमामुळे महाराष्ट्रात येण्याचा मुहूर्त त्यांना गवसला आहे. पुणे येथील कार्यक्रम आटोपून केजरीवाल नाशिकमध्ये 17 एप्रिल रोजी रोड शो करणार आहेत.


नाशिक लोकसभा मतदारसंघातील लक्षवेधी लढतीत ‘आप’कडून सेवानिवृत्त अभियंता विजय पांढरे हे रिंगणात आहेत. पांढरे यांचा सामना राष्ट्रवादीचे हेविवेट नेते छगन भुजबळ यांच्यापासून तर मागील वेळा जबरदस्त लढत देणारे शिवसेनेचे हेमंत गोडसे, त्याचप्रमाणे नवनिर्माणाच्या मुद्यावर शहरातील सत्ता ताब्यात घेणार्‍या मनसेच्या डॉ. प्रदीप पवार यांच्यासारख्या मातब्बरांशी आहे. याबरोबरच बसपा, डाव्या आघाडीचेही उमेदवार रिंगणात आहे. अन्य उमेदवारांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन किंबहुना स्टार नेत्यांच्या सभा घेतल्या जात असताना तुलनेत ‘आप’ पिछाडीवर होते. प्रस्थापित पक्षाच्या उमेदवारांबाबतची नाराजी कॅच करण्यास ‘आप’ निर्णायक ठरेल असे चित्र असताना स्टार नेत्यांअभावी पुरेशी वातावरण निर्मिती झाली नाही. त्यात प्रचारासाठी आर्थिक चणचण भासू लागल्यानंतर वोटबरोबर नोट देण्याबाबत केलेल्या आवाहनालाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे किमान केजरीवाल यांची एक सभा महत्त्वाच्या टप्प्यात घेण्याची मागणी ‘आप’कडून झाली. मात्र, केजरीवाल यांचा रेल्वेतील ‘आम’ प्रवासात जास्त वेळ जाईल व महत्त्वाच्या मतदारसंघांकडे लक्ष देता येणार नाही, असा मुद्दा पुढे आला. त्यानंतर दिल्ली ते मुंबई विमानाचे तिकीट पाठवण्यासाठी चाचपणी झाली; मात्र खर्च परवडणार नसल्याचे लक्षात आल्यामुळे 11 एप्रिलची त्यांची सभा रद्द झाली. आता, पुणे येथे ‘आप’चे उमेदवार डॉ. सुभाष वारे यांच्या प्रचारासाठी केजरीवाल हे 16 एप्रिलला येणार असल्यामुळे दुसर्‍या दिवशी त्यांचा नाशिकमध्ये रोड शो घेण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.


योगेंद्र यादवांची मध्यस्थी
केजरीवाल यांचा नाशिकमध्ये रोड शो घेण्यासाठी योगेंद्र यादव यांच्यामार्फत प्रयत्न सुरू झाले आहेत. पुण्यातील सभेसाठीही यादव यांची मध्यस्थी यशस्वी झाल्यामुळे नाशिकला तेच माध्यम वापरले जात आहे.