आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Arvind Kejriwal News In Marathi, AAP, Vijay Pandhare, Divya Marathi, Inflation

केजरीवाल हे वाराणसीत अडकून पडल्यामुळे नाशिक दौरा रद्द

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - केजरीवाल हे वाराणसीत अडकून पडल्यामुळे त्यांचा नाशिक दौरा रद्द झाल्याचे विजय पांढरे यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर वाढत्या महागाईत प्रचार करणे आर्थिकदृष्ट्या कठीण असताना पार्टीफंड कमी असल्यामुळे अडचण होतेय अशी जाहीर कबुलीही त्यानी दिली.


‘आप’तर्फे महिलांचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. या वेळी त्यांनी आम आदमीची प्रचारनीती, पक्षनिधीबाबतच्या अडचणीसंदर्भातही पांढरे यांनी उघडपणे मन मोकळे केले. पक्षाने तीन लाख रुपयाचा निधी दिला आहे. त्याबरोबरच लोकांना केलेल्या आवाहनाला अल्प प्रतिसाद मिळाला असून, जेमतेम दीड लाख जमा झाले आहेत. जवळपास साडे चार लाख रुपयांची रक्कम हातात असून महागडे प्रचार साहित्य व खर्च बघता रक्कम निश्चितच कमी आहे असे त्यांनी मान्य केले.


भुजबळांना 19 सवाल
पांढरे यांनी भुजबळ यांना महाराष्ट्र सदन बांधकाम, फर्निचर कंत्राट, ठेकेदाराशी असलेली भागीदारी, इंडिया बुल्सकडून घेतलेले डोनेशन व संशयास्पद आर्थिक व्यवहार, भुजबळ नॉलेज सिटी, तसेच मुंबई एज्युकेशन ट्रस्टशी संबंधित गैरव्यवहारासंदर्भात 19 प्रश्न उपस्थित केले आहे. भुजबळ निदरेष असतील तर जनतेसमोर येऊन निवडणुकीपूर्वी त्यांनी उत्तरे द्यावी असे आव्हानही त्यांनी केले.


असा आहे महिला जाहीरनामा
अँड. मीनल भोसले यांनी महिलांसाठी तयार केलेल्या जाहीरनाम्यात महिला कमांडो फोर्स, घरगुती हिंसाचार थांबवणे, पोलिस ठाण्यात सीसीटीव्ही कॅमेरे लावणे, फास्ट ट्रॅक न्यायालये स्थापन करणे, मुलींना कराटेचे प्रशिक्षण देणे, महिला हेल्पलाइन, मोफत शौचालय, तसेच बसमध्ये 50 टक्के आरक्षणाची सवलत दिली जाणार आहे.