आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आसामी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - आसामातील दंगलीपाठोपाठ मुंबईत झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शहरातील आसामी नागरिक-विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळ्या अफवांमुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. गुवाहाटी एक्स्प्रेसमधून दोनशेहून जास्त आसामी नागरिक गावाकडे परतल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र, ही संख्या एक हजारच्या आसपास असल्याचे सांगण्यात येते.

आसामी नागरिकांनी भीती न बाळगता शहरात राहावे, यासाठी त्यांना भेटून आवाहन केल्याचे पोलिस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांनी सांगितले. अंबड-सातपूर औद्योगिक वसाहतीतील दत्तनगर, पंचवटीतील दिंडोरीरोड यासह ठिकठिकाणी सुमारे चार-पाच हजार आसामी व ईशान्य भारतातील नागरिक राहतात. गेल्या काही दिवसांपासून दहशतीत वावरणार्‍या या नागरिकांनी गावी जाण्यासाठी तयारी सुरू केली आहे. हे नागरिक राहत असलेल्या वसाहतीत शुकशुकाट जाणवत आहे.
सुरक्षिततेसाठी उपाययोजना - सिडको-अंबडसह अन्य परिसरातील आसामी नागरिकांना स्वत: भेटून सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना केल्या आहेत. त्यांनी घर सोडून जाऊ नये, असे आवाहन केले. त्याचप्रमाणे, उद्योजकांनादेखील त्यांच्याकडे कामास असणार्‍या आसामी नागरिकांची भीती घालवून त्यांच्यात विश्वास निर्माण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पोलिस अधिकार्‍यांना सर्वत्र दक्षता बाळगण्याचे आदेश दिले आहेत. कुलवंतकुमार सरंगल, पोलिस आयुक्त
तथ्यहीन क्लिप्स - शहरातील वेगवेगळ्या भागात गर्दीच्या ठिकाणी आसाम दंगलीच्या बनावट व्हिडीओ क्लिप मोबाइल, इंटरनेटद्वारे पाठविल्या जात आहेत. या माध्यमातून नागरिकांमध्ये द्वेष पसरविला जात आहे. पोलिसांकडून या क्लिप व दृश्ये बनावट, जोडून-तोडून केल्याचे स्पष्ट केले असून, त्यात काहीही तथ्य नसल्याचे म्हटले आहे.