आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आसामींचे नाशिकमधून पलायन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड - आसाममधील हिंसाचारानंतर वणव्यासारख्या पसरलेल्या अफवेमुळे, भयभीत आसामी नागरिकांनी नाशिकमधूनही परतण्यास सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी नाशिकमध्ये वास्तव्यास असणार्‍या रहिवाशांनी लोकमान्य टिळक टर्मिनस-गोहत्ती एक्स्प्रेसने घराकडे परतीचा प्रवासास सुरुवात केली.

यामुळे नाशिकरोड रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी झाली होती. मुंबईहूनच आसामी नागरिकांनी खचाखच भरलेल्या या गाडीत कशीबशी जागा करून नाशकातील नागरिकांनी आसामकडे प्रयाण केले. नाशिक शहरात शिक्षण घेत असलेले विद्यार्थी, चायनिज, हॉटेल तसेच कारखान्यात काम करणारे जवळपास 300 आसामी नागरिकांनी आसामकडे कूच केले. घराकडे परतण्याचे वेध लागल्यावरही त्यांच्या चेहर्‍यावर मात्र चिंता स्पष्ट जाणवत होती.
आईचा फोन आला - नाशिक शहरात सुरक्षित असलो तरी आसाममध्ये असलेल्या आईला जीविताची भीती वाटत असल्याने तिने तातडीने मायदेशी येण्याचा फोन केल्यामुळे जात असल्याची प्रतिक्रिया मायदेशी परतणार्‍या तरुणांनी दिली.
300 जणांचे प्रयाण - एलटीटी-गोहत्ती एक्स्प्रेस आठवड्यातून एक दिवस धावते. या गाडीने स्थानकावरून जवळपास 300 आसामी नागरिकांनी काल प्रयाण केले असल,े तरी प्रत्यक्षात केवळ 70 ते 80 आसामी नागरिकांनी तिकीट काढल्याची अधिकृत नोंद होती. आरक्षण किती जणांचे होते याची अधिकृत माहिती मिळू शकली नाही. प्रवास करणारे प्रवासी हे सर्व गोहत्तीला जात नसून मुगलसरायपासून रंगीया, कामाख्या, बातेढारोड आदी ठिकाणी जात असल्याचे सांगण्यात आले तसेच सर्वजण अफवेमुळे भीतीपोटी नाही तर रमजान ईद साजरी करण्यासाठी गेल्याचे रेल्वे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले.
समजूत काढण्याचा प्रयत्न - शहरातील आसामी नागरिकांना कोणताही धोका नाही. त्यांना योग्य ते संरक्षण पुरविले जाईल. त्यांची भीती दूर करण्यासाठी त्यांना माझा मोबाइल नंबरही दिला आहे. कोणी धमकी देत असेल, तर त्वरित संपर्क साधावा. काही जणांनी केवळ कुटुंबांच्या आग्रहाखातर घरी परतत असल्याचे स्पष्ट केले आहे. डॉ. डी. एस. स्वामी, पोलिस उपायुक्त