आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आसाराम यांच्या एका आश्रमात सुरु झाली शाळा, नाशिकमध्ये बांधला कोटींचा बंगला

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोधपूर/नाशिक - अल्पवयीन मुलीसोबत दुष्कर्म केल्याचा आरोप असलेले स्वयंघोषित संत आसाराम यांच्या भरतपूर येथील आश्रमात आता शाळा सुरु करण्यात आली आहे. हा आश्रम शेत जमीनीवर असल्याने जिल्हा प्रशासनाद्वारे याच्या विरोधात कारवाई केली जात आहे. जिल्हाधिकारी आश्रमाच्या संचालकांशी चर्चा करून येथे शाळा सुरु करण्याचा प्रस्ताव दिला आणि त्याला आश्रमाने होकार दिला आहे. बुधवारी येथे राजकीय महाराज बदनसिंह उच्च माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी आणि शिक्षक पोहोचले. जिल्हाधिका-यांच्या आदेशाने त्यांनी नववी आणि दहावीचे वर्ग येथे सुरु केले आहेत.

महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातही आसाराम यांचा आश्रम आहे. गोदावरी नदीच्या तिरावर असारामबापू ट्रस्टने अनधिकृत रित्या हा आश्रम उभारल्याचे समोर आले आहे.

दिव्य मराठीने या आश्रमाची पाहाणी केली असता अनेक खळबळजनक खुलासे समोर आले आहेत. दिड एकर जागेतील या आश्रमात एक बंगला आहे. त्याबद्दलही गुप्तता पाळण्यात येते.

पुढील स्लाइडमध्ये वाचा, तीन कोटींच्या जागेवर 'कुटीर' उद्योग