आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशाेकमामांच्या ‘लगीनघाई’ने हास्यकल्लाेळ, टाळ्या अन‌् शिट्ट्यांनी दुमदुमले कालिदास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - अायुष्याचा महत्त्वाचा टप्पा असलेलं लग्न जर बापाला मुलगा वयात अाल्यावर करायचं झालं अाणि त्याच वेळी मुलगाही अापली लगीनघाई करीत असेल तर काय हाेईल, याचा धमाल रंगमंचीय अनुभव नाशिककर रसिकांनी गुरुवारी ‘दिव्य मराठी’ उत्सवात अभिनयसम्राट अशाेक सराफ यांच्या ‘लगीनघाई’ या नाटकातून घेतला. अशाेकमामांच्या खुमासदार अदाकारीला सॅल्यूट करीत रसिकांनी या नव्या काेऱ्या नाटकाचा मनमुराद अानंद लुटला. टाळ्या, हशा शिट्यांची दाद देणारे प्रेक्षक नाटक संपले तेव्हा संपूर्ण टीमला अभिवादनासाठी उभे राहिले.

‘दिव्य मराठी’च्या चाैथ्या वर्धापन दिनानिमित्त अायाेजित उत्सवात महाकवी कालिदास कलामंदिरात शांतुषा डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स यांच्या सहकार्याने या नाटकाचा प्रयाेग रंगला. कालिदास कलामंदिर प्रेक्षकांच्या गर्दीने खच्चून भरले हाेते. गॅलरीही शिगाेशिग भरल्याने नाटकातील कलाकारांमध्ये अधिक उत्साह संचारल्याचे जाणवत हाेते. अशाेक सराफ यांच्या प्रवेशापासून नाटकाच्या शेवटापर्यंत रसिक मनसाेक्त हसत हाेते. मध्येच येणाऱ्या हृदयस्पर्शी प्रसंगांनी त्यांचे डाेळे पाणावत हाेते. अशाेक सराफ यांनी राजेश परांजपेचे पात्र साकारताना गाेंधळलेल्या बापाच्या मनाचा ठाव घेतलाच, शिवाय या गाेंधळलेपणातून निर्माण केलेल्या विनाेदांनीही नाटक खेळते ठेवले. हसता- हसता रसिकांना कसे रडवावे, याचे कसब अशाेकमामांतच असल्याची अनुभूती नाट्यप्रेमींना अाली. इरसाल बनवाबनवी आणि धमाल गंमतीने बहार उडाली. अभिनेत्री आदिती देशपांडे यांचा कसदार अभिनय, ओंकार राऊत आणि नियती घाटे यांचे नर्मविनाेद यांनाही रसिकांनी मनापासून दाद दिली. बॉलीवूडमधील प्रसिद्ध नेपथ्यकार शशांक तेरे यांनी नाटकाच्या कथेला साजेसे असे नेपथ्य साकारले हाेते. प्रणोती जोशी यांची आगळी-वेगळी कलरफुल वेशभूषा त्यांच्या कल्पकतेची साक्ष देत हाेती. सुयाेग निर्मित या नाटकाचे लेखन दिग्दर्शन अद्वैत दादरकर यांनी केले अाहे. संगीत अभिजित पेंढारकर, तर प्रकाश व्यवस्था शीतल तळपदे यांनी केली.

नाट्यरसिकांच्या गर्दीने अाेसंडून वाहिले कालिदास कलामंदिर
नाटकासाठीएक दिवस अाधी ‘दिव्य मराठी’च्या कार्यालयात प्रवेशिकांचे वाटप करण्यात अाले हाेते. मात्र, प्रवेशिका मिळू शकलेल्यांनीही नाट्यगृहाबाहेर गर्दी केली हाेती. गर्दी अाेसंडून वाहत असतानाही प्रेक्षकांनी कमालीची शिस्त अाणि संयम दाखवल्याने नाटकाच्या अायाेजनाला चार चाँद लागले. तसेच, सर्व रसिकांना नाटकाचा अानंद लुटता अाला.

नाटकातील कलावंतांचा ‘दिव्य मराठी’तर्फे सन्मान
नाटकाच्यामध्यंतरात ‘दिव्य मराठी’चे निवासी संपादक जयप्रकाश पवार, जनरल मॅनेजर मदनसिंह परदेशी, डेप्युटी एडिटर अभिजित कुलकर्णी यांच्या हस्ते अशाेक सराफ यांच्यासह सर्व कलाकारांचा सन्मान करण्यात अाला. तसेच, शांतुषा डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्सचे संचालक राहुल सावळे यांचाही सत्कार ‘दिव्य मराठी’च्या वतीने करण्यात अाला.

काॅमेडीच्या बादशाहला रसिकांनी केला सलाम
कॉमेडीचाबादशाह म्हणूनच अाेळख असलेल्या अशाेक सराफ यांच्या रंगमंचावरील प्रवेशाच्या वेळी रसिकांनी जाेरदार टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले. अशाेक सराफ यांचे वय, त्यांचा रंगमंचावरील वावर अाणि त्यांचा उत्साह बघून रसिक थक्क झाले अाणि त्यांनी अशाेकमामांच्या अभिनयाला सलाम केला.

पहिल्या प्रसंगापासूनच ‘लगीनघाई’ रंगत गेले. नाटकाची कथा पुढे सरकत असताना रसिक त्यात गुंगून गेले हाेते. सर्वच कलाकारांच्या कसदार अिभनयाला प्रचंड दाद मिळत हाेती. पिता-पुत्रांनी लग्नाचे अामंत्रण देत रसिकांचा निराेप घेतला अन‌् टाळ्यांचा गजरच हाेत राहिला...
बातम्या आणखी आहेत...