आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष: ‘अशोका’, ‘केंब्रिज’ची फीवाढ बेकायदेशीर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - वडाळा चांदसी येथील अशोका युनिव्हर्सल स्कूल आणि नाशिक केंब्रिज स्कूल या शाळांनी शुल्क विनियमन देणगीविरोधी कायद्याचे उल्लंघन करून शुल्कवाढ केल्याचा निष्कर्ष काढत कायद्यातील तरतुदीनुसार त्वरित कार्यवाही करण्याची शिफारस शिक्षणाधिकारी भावना राजनोर यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त चौकशी समितीने केली आहे.

अशोका स्कूल केंब्रिज स्कूल शाळेतील बेकायदेशीर शुल्कवाढ शाळा व्यवस्थापनाच्या मनमानी कारभाराविरोधात शिक्षण बाजारीकरणविरोधी मंचाच्या नेतृत्वाखाली पालकांनी आंदोलन पुकारले होते. २० मे रोजी मंचातील पदाधिकाऱ्यांनी शाळेतील पालकांसह जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्यानंतर मंुबई येथे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेऊन या शुल्कवाढीसंदर्भात माहिती दिली होती.
त्यानंतर शिक्षणमंत्र्यांच्या निर्देशानुसार पालकांच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी समिती नियुक्तीचे आदेश दिले होते. त्यानुसार राजनोर समितीची ३० मे रोजी शिक्षण उपसंचालक कार्यालयाने नियुक्ती केली. या समितीने पीडित पालकांचे पुराव्यासह जबाब घेतले शाळा विश्वस्त आणि मुख्याध्यापकांची समक्ष भेट घेऊन सत्य परिस्थिती जाणून घेतली.
सदर चौकशीकामी या दोन्ही शाळांनी शालेय दप्तरी उपलब्ध असलेल्या कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती सादर करून असहकार्य केल्याचेही चौकशी समितीने या अहवालात म्हटले आहे. त्यामुळे कायद्यानुसार त्वरित कार्यवाही करण्याची शिफारस या समितीने शासनाला केली असून, पुढील कार्यवाहीबाबत प्रतीक्षा आहे.
जास्तीचे शुल्क व्याजासह पालकांना परत करावे
शाळांनीबेकायदेशीर शुल्कवाढ तर केलीच आहे, पण त्याचबरोबर योग्य त्या पालक-शिक्षक संघाची मान्यता २०१६ २०१७ च्या शुल्कवाढीस घेऊन शुल्क विनियमन कायद्याचा शाळांनी भंग केला आहे. त्यामुळे २०१५ २०१६ यासाठी निश्चित केलेले शुल्क २०१६ २०१७ यासाठी त्वरित लागू करावे, असे समितीच्या वतीने प्रशासनास कळविण्यात आले आहे.
बातम्या आणखी आहेत...