आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुठीत आनंद आभाळाएवढा, आपुलकी ग्रुपचा कनाशी येथील आश्रमशाळेतील मुलांसाठी उपक्रम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - चेहऱ्यावर अोसंडून वाहणारा आनंद आणि कुतूहलाने भिरभिरणारे डोळे... असा भाव प्रत्येक मुलाच्या चेहऱ्यावर दिसत होता. नजर फिरेल तिकडे भव्य दुकाने आणि श्रीमंती पाहणाऱ्या या चेहऱ्यांवर समाधानही होते... ही आनंदानुभूती कनाशी येथील आश्रमशाळेतील मुलांच्या 'नाशिक दर्शन' उपक्रमातून दिसली.

नाशिकचे होतकरू तरुण सामाजिक जाणीव असलेल्यांच्या आपुलकी नावाच्या गटाने कळवण तालुक्यातील कनाशी येथील सृष्टी सप्तशृंगी अनाथ बालकाश्रमातील या मुलांचे पालकत्व स्वीकारले आहे. त्याअंतर्गत गटाने आश्रमातील ५० विद्यार्थ्यांना रविवारी नाशिक दर्शनासाठी आणले होते. महत्त्वाची पर्यटन स्थळे दाखवण्यासोबतच व्यावहारिक जीवनात लाभ व्हावा, असा दुहेरी हेतू या उपक्रमामागे होता. प्रारंभी विद्यार्थ्यांना तारांगण, सिटी सेंटर माॅल, तसेच मेकडाॅनल्ड्सची सफर घडवून आणली.
तारांगणात आकाशगंगा, ग्रह, पृथ्वीची निर्मिती याविषयी माहिती देण्यात आली. यानंतर मुलांना माॅलमध्ये नेण्यात आले. या मुलांनी प्रथमच सरकणारे जिने (एस्कलेटर), लिफ्ट, मोठी दुकाने, माॅलमधील खेळणी शहराचा अनुभव घेतला.

या उपक्रमात हेमंत देशपांडे, अश्विनी देशपांडे, चेतन सोनजे, जयेश तळेगावकर, दीपक पवार, सानिका पवार, मनीषा भामरे, पूनम आनंद, शीतल बागले, हेमंत विसपुते, शुभांगी साळवे आदी सहभागी होते. या मंडळींनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, सामाजिक नीतिमूल्यांची शिकवण देण्यास सुरुवात केली आहे.

मजा सरकत्या जिन्यांची
विशेषम्हणजे, मॉलमधील सरकते जिने आणि लिफ्ट त्यांच्यासाठी मोठी अनोखी ठरली. लहानशा मुलांनी या जिन्यांची मस्त मजा घेतली. नव्याने दिसलेल्या या गोष्टी त्यांना आयुष्यभर स्मरणात राहतील, असे चेहऱ्यावर तरळत होते.
दिव्य मराठीतून मिळाली स्थापनेची प्रेरणा
'निधीअभावी वसतिगृहातील विद्यार्थ्यांची उपासमार' या आशयाची बातमी गेल्या दिवाळीत "दिव्य मराठी'त प्रसिद्ध झाल्यानंतर, अशा विद्यार्थ्यांप्रति संवेदनशील व्यक्तींनी एकत्र येऊन आपुलकी गटाची स्थापन केली. राजकीय पक्ष, संघटनेपासून दूर राहत संस्था वंचित मुलांसाठी कार्यरत असल्याचे सदस्यांनी सांगितले.
प्रथमच केली खरेदी
विद्यार्थ्यांच्याव्यवहारज्ञानात भर पडावी, या हेतूने त्यांना मॉलमध्ये खरेदी करण्यास सांगण्यात आले. त्यासाठी प्रत्येकाला ठराविक रक्कम देण्यात आली ठराविक वस्तू खरेदी करून त्याचे बिल करण्यास सांगितले.