आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Asian Youth Games Gold Medal Winner Anjana Thamke Select For State Award Nashik

अंजनाला राज्य शासनातर्फे 11 लाखांचे पारितोषिक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - चीनमधील आशियाई युवा क्रीडा स्पर्धेमध्ये 800 मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणार्‍या नाशिकच्या अंजना ठमकेला राज्य शासनातर्फे 11 लाख रुपये आणि पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. नाशिक येथील कालिदास कलामंदिरात गुरुवारी (ता. 5) आदिवासी विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण विद्यार्थी तसेच शिक्षक आणि आर्शमशाळांचाही या वेळी गौरव करण्यात येणार आहे. आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड, सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ, राज्यमंत्री राजेंद्र गावित, वसंत पुरके हे या वेळी उपस्थित राहतील. आदिवासी विकासमंत्री 30 ऑगस्टला नाशिक येथे आले असता त्यांनी 5 सप्टेंबरपर्यंत पुरस्कार घोषित करून अंजनाचा गौरव करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते.