आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बजेटमधून माझी अपेक्षापूर्ती; प्रश्न विचारा, उत्तर मिळवा!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शुक्रवारी(दि. १८) मांडला जाणाऱ्या राज्य अर्थसंकल्पात जनतेच्या अपेक्षांची कितपत पूर्तता होते, हे जाणून घेण्यासाठी दैनिक दिव्य मराठीने खास उपक्रम हाती घेतला आहे. अर्थसंकल्पाकडून असलेल्या अपेक्षा वाचकांनी आम्हाला कळवायच्या आहेत. अंदाजपत्रक सादर झाल्यानंतर त्यांची पूर्तता झाली किंवा काय याबाबत आमचे अर्थतज्ज्ञांचे पॅनल उत्तरे देणार आहे. वाचकांना गुरुवारी (ता. १७) सायंकाळपर्यंत व्हाॅट्स अप मेसेजच्या स्वरूपात प्रश्न आमच्याकडे पाठवता येतील.

काहीसा बोजड भासणारा अर्थसंकल्प सोप्या शब्दांत वाचकांना कळावा, हा या उपक्रमामागचा हेतू आहे. नोकरदार, व्यावसायिक, उद्योजक, शेतकरी, तरुण, महिला आदी समाजघटकांना समोर ठेवून ‘ दिव्य मराठी’ने नेमलेले तज्ज्ञ जनसामान्यांना समजेल अशा सुलभ भाषेत अंदाजपत्रकाचे विश्लेषण करतील.

असे पाठवा प्रश्न
आपल्यामोबाइलच्या व्हाॅट्सअॅपवरून मुद्देसूद मोजक्या शब्दांत अर्थसंकल्पाकडून असलेली अपेक्षा पाठवावी.
वाचकांनी एका वेळी एकच अपेक्षा पाठवावी. अर्थ क्षेत्राच्या विभिन्न विषयाशी संबंधित तज्ज्ञ त्यावर स्पष्टीकरण देतील.
अपेक्षेखाली अापले नाव, शहराचे नाव आणि अापला नाेकरी-व्यवसाय याबाबतचा तपशील द्यायचा आहे.

तज्ज्ञांचे पॅनल असे...
अरुण कुकडे
ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ बँकर. अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य सामान्य जनतेच्या नजरेतून स्पष्ट करतील.
मनीष कोठारी
उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ महाराष्ट्र चेंबर अाॅफ काॅमर्सच्या लघुउद्योजक समितीचे चेअरमन. उद्याेजकांच्या दृिष्टकाेनातून विश्लेषण.
डॉ. गिरधर पाटील
कृषी अर्थशास्त्राचे अभ्यासक. शेती अर्थसंकल्प परस्पर संंबंधांचे विश्लेषण.
अपेक्षा पाठवण्यासाठी व्हाॅट्सअॅप क्र. ८३९०९०५७२५ आणि ८७९६४४९७७९
बातम्या आणखी आहेत...