आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Assembly Code Of Conduct,latest News In Divya Marathi

आचारसंहितेनंतर पुन्हा लागणार आचारसंहिता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- विधानसभेच्या आचारसंहिता संपतील तोच नव्याने काही भागांत आचारसंहिता लागण्याची चिन्हे आहेत. राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांमुळे दिवाळीनंतर त्यांची आचारसंहिता लागणार आहे.
जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ५५२ सहकारी संस्थांच्या निवडणूक होणे अपेक्षित असून याचा आढावा घेण्यासाठी राज्य सहकारी संस्था निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष मधुकर चौधरी दोन दिवसात नाशिकमध्ये आढावा बैठक घेण्याची शक्यता सुत्रांनी व्यक्त केली आहे.
सहकारी संस्थांच्या निवडणुका निपक्ष पणे पार पडाव्यात याकरीता राज्य शासनाने राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाची स्थापना केली आहे. प्राधिकरणाची घोषणा झाल्यानंतर ते स्थापन होण्यास दीर्घ काळ प्रतिक्षा करावी लागल्यानंतर लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता आणि त्यानंतर लगेचच विधानसभेची आचारसंहिता यामुळे निवडणुका होणा-या संस्थांचे नवीन संचालक मंडळ स्थापन होण्यास पुढील वर्ष उजाडणार आहे. प्राधिकरणाकडून सहकारी संस्थांसाठी निवडणुकांचे नियमही जाहीर झाले असल्याने दिवाळीनंतरच प्रचाराचा धुराळा उडणार आहे.
निवडणुकांसाठी झाली तयारी सुरू
जिल्ह्यातएकूण 947 सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. निवडणुका हाेत असलेल्या त्या त्या संस्थेच्या कार्यक्षेत्रात आचारसंहिता लागेल. प्राधिकरणाने सुचविल्याप्रमाणे तयारी सुरूही झाली आहे. सुनीलबनसोडे, जिल्हाउपनिबंधक