आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय पक्षांचे पदाधिकारी प्रचारापासून दूर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- विधानसभेच्या मतदानाला चार दिवस राहिले असून, एकाही उमेदवाराचा प्रचार अद्याप हवा तसा रंगात अालेला नाही. कारण बहुतांश पदाधिकारी प्रचारापासून दूर आहेत. उमेदवारांकडून नात्या-गोत्यांवर भर दिला जात असून, पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्त्यांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात आहे, असे चित्र सर्वच पक्षांमध्ये दिसून येत आहे.
विशेषतः शहरातील बहुचर्चित पंचवटी पूर्व मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजप, राष्ट्रवादी, मनसे, काँग्रेस, शिवसेना या पक्षांमधील मातब्बर विधानसभेच्या निवडणुकीत उतरले आहेत. या पक्षांतील सर्वच नेत्यांची राजकीय ओळख माजी खासदार, माजी महापौर, दोन स्थायी समिती सभापती, विद्यमान नगरसेवक तर, एक नगरसेवकाचा भाऊ अशी आहे. प्रत्येक पक्षामध्ये तिकीट देण्यावरून नाराजी होती. मात्र, पक्षादेशाप्रमाणे काम करणार असल्याचे सर्वच पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सांगितले. उमेदवारांकडून त्यांना विश्वासात घेणे अपेक्षित होते, मात्र त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष होत असल्याचे दिसते आहे. त्यांना प्रचारापासून दूर ठेवण्यात येत आहे. प्रत्येक उमेदवार व्यक्तिगत भेटीगाठींवर भर देत आहे. नात्या-गोत्यांभोवती प्रचार फिरत आहे.
मतदारदेखीलसंभ्रमात उमेदवारांच्याप्रचारात पक्ष कार्यकर्त्यांपेक्षा बाहुबलीच अधिक दिसत असल्याने मतदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या जिवावर उमेदवार निवडून येण्याची शक्यता होती, ती आता धुसर होत आहे. प्रमुख पदाधिकारी प्रचारात दिसत नसल्याने त्यांना ओळखणारे मतदारदेखील संभ्रमात आहेत.
पदाधिका-यांवर विश्वास नाही
उमेदवारांचापक्ष पदाधिका-यांवर विश्वास नाही. मग पक्षाच्या तिकिटावर उभे का राहता. कार्यकर्ते सांभाळावे लागतात. तोडून चालत नाही. बूथवर गरज पडते, तेव्हा कोणी येत नाही, याचा उमेदवारांनी विचार करावा. देवांगजानी, अध्यक्ष,पंचवटी विभाग राष्ट्रवादी काँग्रेस