आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विधानसभा निवडणुकीमुळे यंदा नवरात्रोत्सव मंडळांत वाढ, गेल्या वर्षाच्या तुलनेत 60 मंडळांची अधिक नोंदणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- विधानसभानिवडणूक आणि नवरात्रोत्सव एकाच कालावधीत आले असल्याने गेल्या वर्षातील संख्येच्या तुलनेत यंदा ६० मंडळे वाढल्याची नोंद झाली आहे. राजकीय पक्षांकडून आर्थिक पाठबळ मिळाल्याने मंडळांची संख्या वाढली आहे. मंडळांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी इच्छुकांकडून विविध बक्षिसांची लयलूट केली जात आहे.
सणासुदीच्या कालावधीतच विधानसभा निवडणूक जाहीर झाल्याने, मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची चांगलीच चांदी होते आहे. गेल्या महिन्यातील गणेशत्सवातही सुमारे १५० मंडळांची वाढ झाली होती. नुकताच सुरू झालेला नवरात्रोत्सवदेखील त्याला अपवाद नाही. निवडणुकीतील इच्छुकांकडून आर्थिक पाठबळ लाभत असल्याने एका भागात दोन ते तीन मंडळांकडून गरबा, दांडियाचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुकांना खेळण्यासाठी पास उपलब्ध करून दिले असल्याने, प्रवेश मोफत करण्यात आला आहे. यापूर्वी सशुल्क पासेसद्वारे मंडळांचा आर्थिक खर्च भागविला जात होता. या वेळी इच्छुकांनी सर्व भार उचल्याचे निदर्शनास येत आहे. छोट्या मंडळांसह मोठ्या मंडळामध्ये उत्कृष्ट नृत्य करणा-यांना बक्षीस देण्यासाठी इच्छुक प्रायोजक आहेत. दरवर्षी दांडिया गरबा खेळण्यासाठी तिकीट अथवा पासअभावी प्रवेश घेऊ शकणा-यासाठी ही मोठी पर्वणीच ठरणार आहे.