आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रमिकांच्या मतदानाचा टक्का आता वाढणार, कामगारांना सुटी देण्याची उद्योजक संघटनांची सूचना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी उद्योजकही सरसावले आहेत. कामगारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी उद्योगांना बुधवारी सुटी देण्याबाबतचा संभ्रम कामगार उपायुक्तांनी दिलेल्या आदेशानंतर संपला असून, उद्योगांना बुधवारी सुटी द्यावीच लागणार आहे. या सुटीतून यातून रासायनिक प्रक्रिया आणि बॉयलर असलेल्या उद्योगांना वगळण्यात आले असले तरी मतदानाकरिता काही काळ कामगारांना द्यावा लागणार आहे. सातपूर, अंबडसह गोंदे, वाडीवऱ्हे, माळेगाव यांसारख्या जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींत राबणारे श्रमिक मतदानाचा टक्का वाढविण्यात मोलाची भूमिका बजावणार आहेत. तीन पाळ्यांत काम होत असलेले उद्योग, परप्रांतीय कामगारांची संख्या काहीअंशी असलेले उद्योग आणि निरंतर प्रक्रिया होत असलेले उद्योग अशा उद्योगांतील काही उद्योजकांत मतदानासाठी कामगारांना पगारी सुटी द्यायची की नाही, याबाबत शंका होती. मात्र, सोमवारी कामगार उपायुक्त आर. एस. जाधव यांनी उद्योजक संघटना व कामगार संघटनांची बैठक घेत पगारी सुटी देणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे निरंतर प्रक्रिया असलेले उद्योग वगळता इतर उद्योगांना पूर्ण दिवसाची पगारी सुटी कामगारांना द्यावी लागणार आहे.
मतदान केले की नाही याची होणार तपासणी : पगारी सुटी घेऊन मतदान केले की नाही, हे तपासण्यासाठी गुरुवारी कंपनीत कामास आल्यावर कामगारांच्या बोटाची शाई तपासावी, मतदान केले नसेल तर शिस्तभंगाची कारवाई करावी, असे आदेशही कामगार उपायुक्तांनी उद्योजकांना िदले आहे. यामुळे िजल्ह्यातील औद्योगिक वसाहतींतील खडखडाट मात्र बुधवारी थंडावणार आहे.