आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Assembly Elections,latest News In Divya Marathi,

काँग्रेसने जिल्ह्यातील उमेदवारांना सोडले वा-यावर,स्टार प्रचारक सभा घेण्यास अनुत्सुक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- राज्यातसत्ताधारी मात्र, जिल्ह्यात दयनीय अवस्था असलेल्या काँग्रेसने विधानसभा निवडणुकीत जिल्ह्याकडे पूर्ण दुर्लक्ष केल्याची स्थिती आहे. स्वबळावर लढण्यामुळे जिल्ह्यात पक्षाच्या अस्तित्वाची लढाई असताना ११ मतदारसंघांत स्वतंत्र उमेदवार दिलेले असूनही पक्षाच्या राज्यस्तरीय नेत्यांनी साफ दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात वेळ फुकट घालवण्यापेक्षा राज्यातील इतर ठिकाणी ताकद लावण्याकडे पक्षश्रेष्ठींचा कल दिसत असल्याने अद्यापही जिल्ह्यात स्टार प्रचारक अथवा माेठ्या नेत्याच्या हस्ते प्रचाराचा नारळ फुटलेला नाही. पक्षाचे ज्येष्ठ नेते जिल्ह्यात सभा घेण्यास उत्सुक नसल्याचे उमेदवारांमध्ये पक्षाने आपणास वाऱ्यावर साेडल्याची भावना बळावली आहे.
जिल्ह्यातील कोणत्या मतदारसंघात पक्षासाठी आशादायी चित्र आहे? याचा आढावा घेतल्यानंतर काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी जळगाव नको, म्हणून प्रचारयंत्रणेला कळवले आहे. तरीही प्रदेशाध्यक्षांनी काही नेत्यांकडे ही जबाबदारी सोपवली असून लवकरच त्यांचे दाैरे जाहीर होणार अाहे. इतर पक्षांच्या जाहीर सभांना प्रारंभ झाला असताना काँग्रेसमध्ये शांतता असल्याने उमेदवारांनीही श्रेष्ठींकडे सभांसाठी तगादा लावला अाहे. गेल्या निवडणुकीत जामनेरमध्ये सभा घेऊनही काँग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतरच्या निवडणुकांचा अनुभवही वाईट असल्याने या वेळी प्रचारास येण्यासाठी काेणीच धजावत नसल्याचे चित्र अाहे. दरम्यान, पक्षाचे जिल्हाध्यक्ष, काही अाजी-माजी पदाधिकारी हे सोनिया गांधी, राहुल गांधी, मुख्यमंत्री चव्हाण, माजी मुख्यमंत्री अशाेक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी प्रचारासाठी यावे, म्हणून आग्रह धरत आहोत.