आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रचारात उतरली किटली.. अन् घुमतोय शिट्टीचा आवाज, गोदावरीला करणार प्रदूषणमुक्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- शिट्टीवाजवून मतदारांना प्रभावित करण्याचा फंडा असो की, क्रिकेटच्या बॅटने भ्रष्टाचाऱ्यांना आऊट करण्याची स्टाइल.. एवढेच नव्हे तर एक चहावाला देशाच्या पंतप्रधानपदापर्यंत मजल मारू शकतो, तर आपणही चहाच्या किटलीच्या माध्यमातून आमदार होऊ शकतो...या विचाराने भारावलेले अनेक अपक्ष उमेदवार प्रचारात दंग झाले आहेत.
राजकीय पक्षांकडून सुरू असलेल्या "कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा' तसेच "मी महाराष्ट्रवादी', "सर्वात पुढे, महाराष्ट्र माझा', अशा जाहिरातींद्वारे मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात असताना, दुसरीकडे अपक्ष उमेदवारांकडून अभिनव पद्धतीने सुरू असलेल्या प्रचारांमुळे मतदारांचे चांगलेच मनोरंजन होत आहे. विधानसभा निवडणुकीत अखेरच्या क्षणी महायुती आघाडी तुटल्याने प्रचाराला खऱ्या अर्थाने रंगत चढली आहे. प्रत्येक मतदारसंघात पंचरंगी लढत होणार असली तरी प्रत्यक्षात मात्र अपक्ष उमेदवारांनीही प्रचारात आघाडी घेतल्याने यंदाच्या निवडणुकीत प्रथमच बहुरंगी लढतीचे चित्र पाहावयास मिळणार आहे. प्रचारासाठी पाच दिवस राहिल्याने अपक्ष उमेदवारांनीही मतदारसंघात फिरून भेटी-गाठी घेऊन प्रचारावर भर दिला आहे.
शहरातील चारही मतदारसंघांत अपक्ष उमेदवार आपले नशीब आजमावत असल्याने निवडणुकीत चांगलीच रंगत आली आहे. तर, राजकीय पक्षांच्या उमेदवारांकडून सर्वसामान्यांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप करत सामान्य माणसांचा प्रतिनिधीच जनतेचे प्रश्न सोडवू शकतो, असा प्रचार अपक्ष उमेदवारांकडून केला जात आहे. देवळाली मतदारसंघात परमदेव फकिरराव अहिरराव यांनी कायद्याचे शिक्षण घेतले असून, ते अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. त्यांची निशाणी शिट्टी असून, लोकांना शिट्टीच्या आवाजातून जागृत करण्याचा प्रयत्न ते करत आहे. तर, गॅस सिलिंडरच्या माध्यमातून महिला मतदारांना आकर्षित करण्यावर अपक्ष उमेदवार डी. जी. सूर्यवंशी यांच्याकडून भर दिला जात आहे.
युवकांना मिळवून देणार रोजगार
तरुणांचादेश अशी ओळख असलेल्या आपल्या देशात बेरोजगारीचा मुख्य प्रश्न आहे. युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने रोजगार मेळाव्यांचे आयोजन केले आहे. यापुढेही असे उपक्रम राबविणार आहे. शेतकऱ्यांचे प्रश्नही सोडवले जातील. -डी. जी. सूर्यवंशी, अपक्ष उमेदवार
सामान्यांचे प्रतिनिधित्व करणार
आमदारखासदार श्रीमंतांचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे सामान्य जनतेेचे प्रश्न सोडविणारा लोकसेवक असण्याची गरज आहे. चहा किटलीच्या माध्यमातून मी कष्टकऱ्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करेन. काझीअयानउद्दीन इयामउद्दीन, अपक्षउमेदवार गटारीच्या दूषित पाण्यामुळे गोदावरीचे पावित्र्य धोक्यात आले असून, गोदावरीला स्वच्छ सुंदर करण्यासाठी प्रयत्न करेन. शासकीय कार्यालयांत भ्रष्टाचार वाढल्याने त्याला आळा घालण्यासाठीही काही ठोस पाऊले उचलली जातील. -इम्रान दगू शेख, अपक्षउमेदवार
शिट्टीचा आवाज
मतदारराजा जागा हो..अशी जोरदार हाक देत देवळाली मतदारसंघात शिट्टीचा अावाज करत प्रचाराची दवंडी पिटली जात आहे. आमदार म्हणून नव्हे तर आमसेवक बनायचे आहे, असा संकल्प करत मतदार राजाला साकडे घालतो आहे. शेतकऱ्यांसह कष्टकऱ्यांचे दैनंिदन प्रश्न सोडविण्याचा माझा प्रयत्न राहील. तसा निर्धार व्यक्त करत प्रचार सुरू आहे. परमदेवफकिरराव अहिरराव, अपक्षउमेदवार