आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांचे नियोजन पूर्ण; बूथनिहाय असेल बंदोबस्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- विधानसभानिवडणुकीच्या मतदानासाठी पोलिस यंत्रणेचे नियोजन पूर्ण झाले असून, शहर पोलिस मुख्यालयाच्या हद्दीत ५३ मतदान केंद्र अतिसंवेदनशील घोषित करण्यात आले आहेत. या केंद्रांच्या ठिकाणी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

विधानसभेसाठी बुधवारी (दि.१५) मतदान होत आहे. ही प्रक्रिया शांततेत पार पाडावी, यासाठी पोलिस यंत्रणेकडून खबरदारी घेण्यात आली आहे. अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून, मंगळवारी रात्री बंदोबस्त मार्गी लागणार आहे.
शहर पोलिसांच्या हद्दीत नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम, नाशिक मध्य आणि देवळाली मतदारसंघांचा समावेश आहे. तर, देवळाली मतदारसंघाचा काही भाग तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत आहे. एक पोलिस कर्मचारी, एक होमगार्ड असे बुथनिहाय बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. तर, ग्रामीण हद्दीतील केंद्रांवरील बंदोबस्त बुधवारी सकाळी तैनात करण्यात येणार आहे. पोलिस मुख्यालयाच्या हद्दीत १,०६७ मतदान केंद्रांवर बुधवारी मतदान होणार आहे.
नियोजन पूर्ण पोलिसांचेनियोजन पूर्ण झाले असून, कोठेही अनुचित प्रकार घडल्यास त्या व्यक्तींविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार आहे. संदीपदिवाण, पोलिस उपायुक्त