आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Assistant Registratar Charges 10 Thousand Panishment: No Giving Information

येवल्याच्या सहायक निबंधकांना 10 हजार रुपयांचा दंड : माह‍िती न दिल्‍याचा परिणाम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

येवला - सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीबाबत माहिती माहितीच्या अधिकारात जिल्हा उपनिबंधकांकडे अपील करूनही माहिती दिली नाही. त्यामुळे राज्य माहिती आयोगाच्या नाशिक खंडपीठाने येवल्याच्या सहायक निबंधकांना 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

पिंपळगाव लेप येथील बाळासाहेब दौंडे यांनी माहितीच्या अधिकारात निवडणुकीच्या संदर्भात मतपत्रिका, तक्ता, मतमोजणी केलेले शीट याबाबत 27 डिसेंबर 2010 रोजी जिल्हा उपनिबंधकांकडे अर्जाद्वारे माहिती मागितली होती. 24 फेब्रुवारी 2011 पर्यंत माहिती न मिळाल्याने दौडे यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे अपील दाखल केले होते. जिल्हा उपनिबंधकांनी 14 सप्टेंबर 2011 रोजी सुनावणी घेऊन जनमाहिती अधिकारी तथा सहायक निबंधक अभिजित देशपांडे यांना तत्काळ माहिती उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले होते. मात्र त्यानंतरही दौडे यांना माहिती मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी दुसरे अपील राज्य माहिती आयोगाच्या नाशिक खंडपीठाकडे 20 जुलै 2011 रोजी दाखल केले. त्यामुळे खंडपीठाने 15 दिवसाच्या आत माहिती देण्याचा आदेश दिला. त्यानुसार 16 डिसेंबर 2012 रोजी देशपांडे यांनी माहिती उपलब्ध करून दिली. परंतु, नियमानुसार 30 दिवसाच्या आत अर्जदाराला माहिती देणे बंधनकारक असताना त्याची पूर्तता झाली नाही. त्यामुळे खंडपीठाने देशपांडे यांना 10 हजाराचा दंड ठोठावला. ही रक्कम शासकीय कोषागारात भरावी, असेही खंडपीठाने म्हटले आहे.