आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Astronomy Study Do Need Scientifically Says Author Sujata Babar

खगोलशास्त्र अभ्यास वैज्ञानिक दृष्टीने व्हावा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- एकविसाव्या शतकातही अवकाशातील घटनांविषयी गैरसमज असतात. धूमकेतू आणि ग्रहणांविषयीचे गैरसमज दूर होण्यासाठी विज्ञान अधिक लोकप्रिय होण्याची गरज आहे. खगोलशास्त्राची आवड आणि अभ्यास झाल्यास ही भीती दूर होईल, असे प्रतिपादन खगोलशास्त्राच्या अभ्यासक लेखिका सुजाता बाबर यांनी केले.

शंकराचार्य संकुलात नवनीत पब्लिकेशन आणि ज्योती स्टोअर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘लेखक तुमच्या भेटीला’ या उपक्रमातील नववे विचार पुष्प गुंफताना ‘धूमकेतू अनाहुत पाहुणे’ या विषयावर बोलताना या बोलत होत्या. यावेळी सायन्स फोरमचे समन्वयक अनिल क्षत्रिय, जयंत खैरनार, राजाभाऊ मोगल आदी उपस्थित होते. ग्रहणे कधी तरी घडत असल्याने भीती निर्माण झाली आहे. धूमकेतूबद्दलही अनेक गैरसमज आहेत. त्यामुळे विज्ञानाचा आणि खगोलशास्त्राचा अभ्यास होण्याची गरज आहे, असे बाबर म्हणाल्या.

स्लाइड शोमधून धूमकेतूचे रहस्य
सुजाता बाबर यांनी सांगितले की, धूमकेतूचा चिनी अभ्यासकांनी खोलवर अभ्यास केला आहे. फ्रेड व्हिपलच्या सिद्धांतानुसार धूमकेतू बर्फाचा गोळा (हिमगोलक) आहे. धूमकेतूची रचना आणि रहस्य स्लाइड शोमधून उलगडण्यात आले.

विज्ञान केंद्र व्हावे
वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्याची गरज असून लहान मुलांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण होण्यासाठी नाशिकमध्ये विज्ञान केंद्र व्हावे. त्यासाठी शैक्षणिक संस्था आणि राजकीय व्यक्तींनी पुढे येण्याची गरज आहे, असे आवाहन सायन्स फोरमचे अनिल क्षत्रिय यांनी केले.