आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Athletics Competition: Bhagyesh Along With Kisan, Tai, Durga Selected For State

अॅथलेटिक्स स्पर्धा: भाग्येशसह किसन, ताई, दुर्गाची राज्य संघात निवड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - केरळमधील काेझीकाेडेमध्ये २९ जानेवारी ते फेब्रुवारीदरम्यान हाेणाऱ्या राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेसाठी नाशिकच्या भाग्येश साखलासह किसन तडवी, दुर्गा देवरे अाणि ताई बामणे यांची महाराष्ट्राच्या संघात निवड झाली अाहे.

राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेसाठी १४ वर्षांखालील, १७ वर्षांखालील अाणि १९ वर्षांखालील अशा संघांमधील खेळाडूंची निवड राज्यस्तरावरून जाहीर करण्यात अाली अाहे. त्यात ताई बामणे १४ वर्षांखालील मुलींच्या गटात, भाग्येश साखला १७ वर्षांखालील गटात, तर किसन तडवी १९ वर्षांखालील मुलांच्या गटात अाणि दुर्गा देवरे १९ वर्षांखालील मुलींच्या गटातून महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार अाहेत. या चारही खेळाडूंनी यापूर्वीच्या राष्ट्रीय स्पर्धांमध्ये महाराष्ट्राच्या संघात खेळताना विविध गटांत सुवर्णपदके पटकावलेली अाहेत.

उगवता तारा
क्रीडाक्षेत्रामध्ये नाशिकच्या क्रीडापटूंनी काही वर्षांपासून झेंडा फडकवत ठेवला अाहे. अॅथलेटिक्समध्ये भाग्येश साखलाच्या रूपाने नव्या ताऱ्याचा उदय झाला अाहे. ताे राज्य संघाचे प्रतिनिधित्व १७ वर्षांखालील मुलांच्या गटातून करणार अाहे. या सर्वांनी यापूर्वी राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदके प्राप्त केली अाहेत.