आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हॉटेल व्यवस्थापकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला; टोळी जेरबंद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - हॉटेल व्यवस्थापकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करणाऱ्या पाच जणांच्या टोळीस पंचवटी पोलिसांनी गणेशवाडी येथे जेरबंद केले. बुधवारी रात्री हॉटेल कुणाल येथे हा प्रकार घडला होता.
महामार्गावरील हॉटेल कुणाल येथे पाच जणांच्या टोळक्याने व्यवस्थापक चितेश्वरसिंग यांच्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केला होता. या प्रकरणी पंचवटी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या आधारे मयूर भास्कर पवार, राकेश नवले, नितीन मराठे, अक्षय कदम िवशाल कोरडे यांना गणेशवाडी परसिरात सापळा रचून अटक केली. पोलिस हवालदार वसंत पांडव, संजय पवार, राजेश लोखंडे, विजय वरंदळ, प्रवीण वाघमारे यांच्या पथकाने ही कारवाई केली. संशयितांकडून प्राणघातक हत्यारे हस्तगत करण्यात आली आहेत. जखमीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.