आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिडकोत पोलिसावर प्राणघातक हल्ला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडको - अंबड पोलिस ठाण्यातील कर्मचार्‍याने रात्रीच्या वेळी तिघांना हटकल्याचा राग आल्याने त्यांना बेदम मारहाण केल्याची घटना त्रिमुर्ती चौकात बुधवारी घडली. याप्रकरणी पोलिसांनी तपासाची सुत्रे फिरवित सराईत गुन्हेगारासह तिघांना अटक केली.

हवलदार गणेश वाघ हे रात्री त्रिमुर्तीतील हॉटेल सुयोग समोरून जात असताना त्यांना सराईत गुन्हेगार मनोज मोगल आपल्या साथीदारांसोबत उभा असल्याचे दिसला. त्याचवेळी वाघ यांनी त्याची विचारपूस केली असता त्याचा राग आल्याने त्याच्यासह त्याच्या दोघा साथीदारांनी वाघ यांच्यावर हल्ला चढवला. पोलिसांना हा प्रकार समजताच निरीक्षक किशोर सुर्यवंशी यांच्यासह कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. संशयित मोगल याच्यासह अमोल शेळके, चेतन पगार यांच्याविरूद्ध सरकारी कामात अडथळा आणि प्राणघातक हल्लयाचा गुन्हा दाखल करीत अटक करण्यात आली. उपनिरीक्षक वाघ तपास करीत आहेत.
पोलिसांना मारहाणीचे सत्र

उपनिरीक्षक गावित यांच्यावर सराईत गुन्हेगार समीर पठाण याने हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा गुन्हेगारांकडूनच पोलिसावर हल्ला करण्याची घटना घडली. महिन्याभरापुर्वीच सिडकोतील राजकीय कार्यकर्त्यावर कारवाई केल्याचा राग येऊन पोलिस कर्मचार्‍यास थेट धक्काबुक्कीचा प्रकार घडला होता. या घटनेत मात्र, संबंधित कर्मचार्‍यालाच वरिष्ठांनी सुनावल्याने कर्मचार्‍यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. पोलिसांवरील हल्यांमुळे त्यांचे मनोबल खचत असून कठोर कारवाईची मागणी होत आहे.

उशिरापर्यंत हॉटेल्स सुरू

दरम्यान, ज्या ठिकाणी पोलिस कर्मचार्‍यावर मारहाणीची घटना घडली, त्याठिकाणी आणि त्रिमुर्ती चौक परिसरातील बहूतांश हॉटेल्स, बीअरबार रात्री उशिरापर्यंत सुरू असतात. पोलिस गाडी येताच दिवे बंद केले जातात, आणि ते जातात पुन्हा उद्योग सुरू असेच दररोजचे चित्र आहे. बहूतांशवेळा याच हॉटेलच्या समोर पोलिसांचीच जीप उभी असल्याचेही दिसून येते.