आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्न समारंभात तरुणावर हल्ला, पिस्तूल दाखवून संशयित फरार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: याच बेसबॉलच्या बॅटने हल्ला चढवला.
नाशिक - लग्न समारंभासाठी आलेल्या राजेंद्र नारायण कुटे (वय ३७, रा. सायखेडा) यांच्यावर चौघांच्या टोळक्याने पिस्तुलाचा धाक दाखवत बेसबॉलच्या बॅटने प्राणघातक हल्ला केला. मंगळवारी (दि. २८) दुपारी वाजेच्या सुमारास तपोवन परिसरातील जय मौनगिरी गार्डन परिसरात ही घटना घडली. हा प्रकार लक्षात येताच हल्लेखाेरांना पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या वऱ्हाडींना पिस्तुलाचा धाक दाखवत चाैघेही फरार झालेे. त्यांनी पळून जाताना गाेळीबार केल्याचीही अफवा पसरली हाेती. ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून हा हल्ला करण्यात आल्याचे सांगण्यात येते. जखमी कुटेंवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सूत्रांनी सांगितले. या प्रकरणी आडगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

कुटेयांच्या भावाचा विवाह ढाकणे कुटुंबातील वधूसमवेत झाला. दुपारी लग्नसमारंभ आटोपल्यानंतर वऱ्हाडी मंडळीची जेवणे सुरू असतानाच ते काही नातेवाईकांना निराेप देण्यासाठी प्रवेशद्वारापर्यंत आले. त्याच वेळी तेथे दबा धरून बसलेल्या चौघांनी कुटे यांच्यावर बेस बॉलच्या बॅटने हल्ला चढवला. हा प्रकार नातेवाईकांच्या लक्षात आला. त्यांनी हल्लेखोरांना पकडण्याचा प्रयत्न केला असता. एका संशयिताने पिस्तूल काढून धमकावले. त्यामुळे वऱ्हाडींची धावपळ उडाली. त्या गर्दीचा फायदा घेत चाैघेही दुचाकीवरून फरार झाले. कुटे यांना गंभीर जखमी अवस्थेमध्ये खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डोक्याला गंभीर स्वरूपाच्या जखमा असल्याने त्वरित शस्त्रक्रिया करण्यात आली. तसेच त्यांचे दोन्ही पाय मोडले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याबाबत माहिती मिळताच आडगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अनिल पवार पथकासह घटनास्थळी पाेहाचले त्यांनी चाैघा संशयितांबाबत माहिती घेतली. संशयितांपैकी एकाची आेळख पटली असून अरुण घुगे असे त्याचे नाव आहे. त्याच्यासह चाैघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रत्यक्षदर्शींचे नाेंदविले जबाब
या प्रकरणी प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवणे सुरू आहे. जखमी बेशुद्ध आहे. ते शुद्धीवर आल्यानंतरच खरा प्रकार समोर येईल. अनिल पवार, वरिष्ठ निरीक्षक, आडगाव पोलिस ठाणे

आनंदोत्सवामध्ये विघ्न...
हाणामारीच्या घटनेनंतर विवाह सोहळ्यामध्ये दहशत पसरली. वऱ्हाडींनी तेथून त्वरित काढता पाय घेतला. त्यामुळे विवाहानंतर वधू-वराजवळ मोजकेच नातेवाईक उपस्थित होते.

झाडामागे लपले हाेते चाैघे...
कुटेहे नातेवाइकांना निराेप देण्यासाठी प्रवेशद्वारापर्यंत जाताच झाडाच्या पाठीमागून चार तरुण आले. हत्यारे, बेसबाॅलच्या बॅटने त्यांनी कुटेंना अमानुष मारहाण केली. बाळासाहेबकानकाटे, जखमीचे मावसभाऊ

निवडणूकवादातून धमक्या
ग्रामपंचायतनिवडणुकीच्या वादातून सायखेडा येथील काही तरुणांनी भावावर हा हल्ला केला आहे. त्यांना तशा धमक्याही देण्यात येत हाेत्या. वैशाली आघाव, बहीण
बातम्या आणखी आहेत...