आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांवरील हल्ले प्रकरणांत ‘फास्ट ट्रॅक’ निकालाचे प्रयत्न; मुख्यमंत्र्यांची घाेषणा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- यापुढे सहजासहजी काेणाचीही हात टाकण्याची हिंमत हाेणार नाही, अशा पद्धतीने पाेलिसांवर हल्ले करणाऱ्यांना कठाेर शिक्षा करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न असणार अाहे. त्याचाच एक भाग म्हणून पाेलिसांवरील हल्ले प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक काेर्टात करण्याबाबत मुख्य न्यायाधीशांकडे अापण स्वत: विनंती करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी सांगितले.

गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात पाेलिसांवर हल्ले वाढले अाहेत. लाेकप्रतिनिधींकडूनही पाेलिसांना मारहाण हाेत असल्याचे समाेर अाले अाहे. नाशिकमध्येही मुख्यमंत्र्यांच्या दाैऱ्याच्या काही तास अाधी पाेलिसांवर हल्ले झाल्याचे प्रकार घडले. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले, ‘पाेलिसांवर हल्ला ही अत्यंत गंभीर बाब अाहे. ताे काेणा एक कर्मचाऱ्यावर हल्ला नसून संपूर्ण पाेलिस दलावरच अाघात असताे. विशेष म्हणजे अाताच एकाएकी पाेलिसांवर हल्ले वाढलेले नसून यापूर्वी जे प्रमाण हाेते तेच अाजही अाहे. फक्त यात एक बाब गंभीर अाहे, ती म्हणजे पाेलिस हल्ले प्रकरणात संशयितांना शिक्षा हाेण्याचे प्रमाण कमी अाहे. या पार्श्वभूमीवर शासनाने पहिले पाऊल म्हणून पाेलिसांवर हल्ल्याचा गुन्हा अजामीनपात्र केला अाहे. अाता मुख्य न्यायाधीशांची भेट घेऊन अशा खटल्यांचे कामकाज फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावे, अशी विनंती अापण करणार अाहाेत. पाेलिस कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात समितीही गठित करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

पाेलिस असुरक्षित असल्याची जाणीव सरकारलाही व्हावी, यासाठी नाशिकमध्ये एका संघटनेने पाेलिसांच्या सुरक्षेबाबत फलक लावून मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले.
बातम्या आणखी आहेत...