आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाई-वडिलांसमाेरच सराईतावर तिघांचे काेयत्याने सपासप वार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- पंचवटीतील सराईत गुन्हेगार रितिक शेरगिल ऊर्फ पाप्या याच्या खून प्रकरणातील मुख्य संशयित चेतन पवार शनिवारी (दि. १९) बालन्यायालयातील साक्ष अाटाेपून अाई वडिलांसह कपडे खरेदीसाठी तिबेटियन मार्केट परिसरात गेला असताना दुचाकीवरून अालेल्या तिघांनी पाठलाग करत त्याच्यावर काेयत्याने वार केले. या घटनेत ताे गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू अाहेत. शहराच्या उच्चभ्रू वसाहतीत अचानक घडलेल्या या प्रकारामुळे पळापळ हाेऊन घबराट पसरली हाेती. 

पाप्या खून प्रकरणाची शनिवारी बालन्यायालयात सुनावणी होती. चेतन आई भावासाेबत दुपारी बालन्यायालयात साक्षीसाठी गेला होता. साक्ष पूर्ण झाल्यावर सायंकाळी वाजेच्या सुमारास कपडे खरेदी करण्यासाठी ते तिघे रिक्षाने तिबेटियन मार्केट येथे गेले हाेते. त्याचवेळी दुचाकीवरून तिघेजण हातात शस्त्रे घेऊन येत असल्याचे बघून चेतनने तेथून पळ काढला. मात्र, त्या तिघांनी त्यांच्याकडील काेयत्याने चेतनच्या कमरेवर डोक्यावर प्राणघातक हल्ला करून पलायन केले. त्याला अाधी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात अाले. गंभीर जखमी असल्याने नंतर पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेण्यात अाले. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे पाेलिसांनी सांगितले. 

दरम्यान, पाेलिसांना घटनास्थळी दाेन काेयते सापडले अाहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सरकारवाडा पोलिस हल्लेखाेरांची अाेळख पटवून त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत अाहेत. 

या घटनेमुळे शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला अाहे. गुरुवारी रात्रीच पंचवटीत बाल्या नामक गुन्हेगाराचा गाेळ्या झाडून खून करण्यात अाला हाेता. त्यानंतर दाेन दिवसांतच भरदिवसा अाणखी एका गुन्हेगारावर काेयत्याचे वार झाल्याने गुन्हेगारांना पाेलिसांचा धाक उरलेला नसल्याचे बाेलले जात अाहे. मध्यंतरी पाेलिसांनी धडक माेहीम राबवत गुन्हेगारी टाेळ्यांचे कंबरडे माेडले हाेते. अाता अन्य गुन्हेगार डाेके वर काढू लागल्याने यंत्रणेने पुन्हा कठाेर हाेण्याची गरज असल्याची मागणी करण्यात येत अाहे. 

तिबेटियन मार्केट परिसरात अाईबराेबर खरेदीसाठी अालेल्या मुलावर अाईसमाेरच काेयत्याने वार करण्यात अाले. या हल्यात वापरण्यात अालेला काेयता पाेलिसांनी घटनास्थळावरून जप्त केला. 
बातम्या आणखी आहेत...