आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दहावी-बारावी परीक्षेला उशिरा येणाऱ्यांनाे सावधान.. पेपरला मुकावे लागणार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- अभ्यासाचे टेन्शन... धावपळ... अाराेग्याच्या समस्या या कारणांमुळे जर तुम्हाला दहावी वा बारावीच्या परीक्षेला जाण्यास विलंब झाला तर संबंधित विद्यार्थ्याला त्या दिवशीच्या पेपरलाच मुकावे लागणार अाहे. परीक्षेत हाेणाऱ्या गैरप्रकारांना अाळा घालण्यासाठी शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला अाहे. यापूर्वी पेपरला अर्धा तास उशीर ग्राह्य धरला जात हाेता. 


दहावी-बारावीचे पेपर म्हटले की, विद्यार्थ्यांना महिनाभर अाधीच पाेटात गाेळा येताे. काहींना तर अतिकाळजीपाेटी परीक्षेला उशीर झाल्याचे स्वप्न पडतात. अाता मात्र विद्यार्थ्यांच्या टेन्शनमध्ये अधिक वाढ हाेणार अाहे. कारण परीक्षेला पाच मिनिटे जरी उशीर झाला तरी त्याला परीक्षा देता येणार नाही. विद्यार्थ्यांना शांत तणावमुक्त वातावरणात परीक्षा देता याव्यात यासाठी शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला अाहे. त्यामुळे या नव्या नियमानुसार ११ च्या पेपरला अकरापूर्वीच केंद्रावर हजर रहावे लागणार आहे. सर्व केंद्रप्रमुखांनाही तसा अहवाल केंद्रास द्यावा लागणार आहे. या निर्णयाची कडक अंमलबजावणी करावी, अशा सूचना शालेय शिक्षण विभागाने माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळास दिल्या आहेत. तसा अध्यादेश लवकरच प्रसिद्ध हाेणार अाहे. या अादेशामुळे अाता परीक्षार्थींना परीक्षा केंद्रावर वेळेत उपस्थित रहावे लागेल. 


का घेतला हा निर्णय? 
दहावी-बारावीपरीक्षेत गेल्या काही वर्षांत राज्यात अनेक परीक्षा केंद्रावर पेपरफुटीच्या घटना घडल्या अाहेत. याचा शासनाने मागाेवा घेतला असता परीक्षेत विद्यार्थ्यांना अर्धा तास उशिरा येण्याची सवलतीतून असे प्रकार घडत आहेत. सकाळी ११ वाजता पेपर सुरू झाल्यानंतर शाळेतील कर्मचारी वा एखादा विद्यार्थी पेपरचा माेबाइलद्वारे चाेरून फाेटाे काढताे अाणि ताे साेशल मीडियाच्या माध्यमातून संबंधितापर्यंत पाेहाेचवताे. अर्ध्या तासापर्यंत संबंधित विद्यार्थी प्रश्नांचा अभ्यास करून परीक्षेला येत हाेते, असे काही प्रकरणे उघडकीस अाले हाेते. यातूनच पेपरफुटी होते. विद्यार्थी कॉपीसारखे प्रकार करतात. या पार्श्वभूमीवर शासनाने परीक्षेला उशिरा येण्यावरच बंधन घातले अाहे. 

बातम्या आणखी आहेत...