आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Atyachar Virodhi Kruti Samiti Agitation In Nashik

दहशत पसरविणार्‍या संघटनांवर बंदी घाला, जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - ‘शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकाच्या प्रयोगास विरोध करणार्‍या आणि सांस्कृतिक दहशतवाद पसरवणार्‍या सांस्कृतिक संघटनांचा धिक्कार असो, या संघटनांवर बंदी घातलीच पाहिजे, अशी घोषणाबाजी करत अत्याचारविरोधी कृती समितीने जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे मागणी केली. आठ दिवसात या मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर आंदोलने करण्याचा इशारा या वेळी देण्यात आला.

परशुराम जयंती उत्सव समिती, हिंदू एकता आंदोलन, शुक्ल यजुर्वेदीय ब्राrाण संस्था, पुरोहित संघ या सर्व संघटना सांस्कृतिक दहशतवादाचा प्रचार आणि प्रसार करत असल्याने सामाजिक स्वास्थ बिघडत आहे. या नाटकात मांडण्यात आलेल्या सत्य परिस्थितीमुळे मनुवादी नीतीसमोर येणार असल्याच्या भीतीपोटीच या संघटना त्यास विरोध करत आहे, असा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर घोषणाबाजी केली. ‘शिवाजी अंडरग्राउंड’ या प्रयोगास दादागिरी, दडपशाहीने भावनिक राजकारण करून बंद पाडण्याचा प्रयत्न करणार्‍यांचा या वेळी निषेधही करण्यात आला. या वेळी परिवर्तनवादी, आंबेडकरवादी, रिपब्लिकन, डाव्या समाजवादी, संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, राष्ट्रमाता फाउंडेशन अशा विविध संघटनांचे राहुल तुपलोंढे, अँड. अरुण दोंदे, योगेश निसाळ, नितीन रोटे पाटील, संतोष गायधनी, मिलिंद सावंत, माधुरी भदाणे आदींसह विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

संभाजी ब्रिगेडचाही आंदोलनाला पाठिंबा

‘शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला’ हे नाटक धर्मविरोधी नसून, ते शिवरायांच्या व्यावहारिक दृष्टिकोन, महाराजांचा इतिहास व शिवव्यापी विचारांवर आधारित आहे. मात्र, काही संघटनांनी त्यास हेतुपुरस्सर विरोध करून महाराष्ट्रीय जनतेच्या भावना दुखावल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने करत कृती समितीच्या आंदोलनास जाहीर पाठिंबा दिला.